वृत्तसंस्था
मुंबई : यंदा पाऊस केव्हा येणार ? याची उत्सुकता सर्वाना असते. अर्थात त्याचे आगमन ऋतूचक्राप्रमाणे होतच आले आहे. कधी तो रुसतो तर कधी रागावतो आणि रेंगाळतो सुद्धा. पण, यंदा तो विपूल आऊन महिन्याखेरीस म्हणजेच 31 मे रोजी केरळात दाखल होणार आहे. Monsoon Will Arrive In Kerala on 31 May
मॉन्सूनच्या आगमनात चार दिवस कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. या वर्षी देशभरात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज पूर्वीच जाहीर झाला आहे. त्यामुळे तो विपूल पडणार यात शंका नाही.
सर्वसाधारणपणे मॉन्सूनचे आगमन १ जून रोजी केरळवर होत आले आहे. गेल्या वर्षी हवामान विभागाने १ जून रोजी मॉन्सून येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात त्याचे ५ जून रोजी आगमन झाले होते. हवामान विभागाकडून दरवर्षी १५ मे रोजी मॉन्सूनच्या केरळमधील आगमनाविषयीचा अंदाज जाहीर करण्यात येतो. यंदा तो १४ मे रोजी जाहीर करण्यात आला आहे.
दक्षिण अंदमान समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात मॉन्सूनचे वारे हे २१ मेपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर अंदमान समुद्रात २२ मे रोजी मॉन्सून स्थिरावेल. सध्या अरबी समुद्रात चक्रीवादळ आल्याने मॉन्सूनच्या आगमनाला बळकटी येणार आहे.
Monsoon Will Arrive In Kerala on 31 May
महत्त्वाच्या बातम्या
- आमने-सामने : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची पंतप्रधानांवर टीका ; ‘परफॉर्मन्सचा’ पाढा वाचत भिडले भातखळकर
- कोरोनाचा कहर वाढल्यानंतर राज्यांचा कांगावा, पंतप्रधानांसह केंद्राने जानेवारीपासूनच अनेक वेळा दिला होता इशारा
- कर्नाटकाच्या गृहमंत्र्यांचा आदर्श, कोविड केअर रुग्णालयासाठी दिले आपले घरच
- उत्तर प्रदेशात तुरुंगातच थरार, बाहुबली मुख्तार अन्सारी याच्या गॅगमधील दोन कुख्यात गुंडाची हत्या