• Download App
    Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाच्या 6व्या दिवशी सदनाचे कामकाज 8 वेळा तहकूब, पण 8 मिनिटांत मंजूर झाले हे विधेयक । monsoon session proceedings of the house adjourned 8 times two bills passed

    Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाच्या 6व्या दिवशी सदनाचे कामकाज 8 वेळा तहकूब, ही दोन विधेयके मंजूर

    Monsoon Session :  संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरू झाला आहे. अधिवेशनाच्या सहाव्या दिवशीही मोठा गदारोळ झाला. पेगॅसस हेरगिरीच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गोंधळ घातला. यादरम्यान राज्यसभा 5 वेळा आणि लोकसभा 3 वेळा तहकूब करावी लागली. तथापि, लोकसभेने दोन विधेयके मंजूर केली, ही सरकारला दिलासा देणारी बाब होती. monsoon session proceedings of the house adjourned 8 times two bills passed


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरू झाला आहे. अधिवेशनाच्या सहाव्या दिवशीही मोठा गदारोळ झाला. पेगॅसस हेरगिरीच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गोंधळ घातला. यादरम्यान राज्यसभा 5 वेळा आणि लोकसभा 3 वेळा तहकूब करावी लागली. तथापि, लोकसभेने दोन विधेयके मंजूर केली, ही सरकारला दिलासा देणारी बाब होती.

    पेगॅगस आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष सरकार हल्ला करत आहे. गोंधळामुळे झीरो अवर आजही राज्यसभेत होऊ शकला नाही. झीरो अवरदरम्यान काही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी वेगवेगळ्या विषयांवर दिलेल्या नोटिशींचा संदर्भ दिला.

    सुरुवातीपासूनच विरोधकांचा गोंधळ

    त्याचबरोबर अध्यक्ष म्हणाले की, आज त्यांना झीरो अवरअंतर्गत विविध विषय उपस्थित करण्याबद्दल 12 सदस्यांकडून नोटिसा मिळाल्या आहेत आणि विशेष उल्लेखही आहे, परंतु त्यांनी या नोटीसला मान्यता दिली नाही, त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात गोंधळ घातला आणि दिवसभर कोणत्याही विषयावर चर्चा होऊ शकली नाही.

    दोन विधेयके मंजूर

    त्याच वेळी लोकसभेत कारगिल शहिदांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर आणि मीराबाई चानू यांचे अभिनंदन केल्यावरच विरोधकांनी गोंधळाला सुरुवात कली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांना 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करावे लागले. पुन्हा कामकाज दोन वाजता सुरू झाल्यावर लोकसभेच्या सभापतींनी कठोर भूमिका घेत म्हटले की, ‘घोषणाबाजी करून उत्तरे मागतात आणि नंतर उत्तरे ऐकूनही घेत नाहीत, हे योग्य नाही. तथापि, यादरम्यान राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान संस्था, उद्योजकता आणि व्यवस्थापन विधेयक आणि फॅक्टरिंग रेग्युलेशन (दुरुस्ती) विधेयक, 2021 विधेयक मंजूर झाले. फॅक्टरिंग रेग्युलेशन (दुरुस्ती) विधेयक 2021 अवघ्या 8 मिनिटांत मंजूर झाले. दोन्ही विधेयके अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केली.

    लोकसभा अध्यक्षांनी घेतली अमित शहा यांची भेट

    लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एका आठवड्यापासून सुरू असलेला संसदेतील गोंधळ संपुष्टात आणण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्याचवेळी संसदीय कामकाज मंत्री प्रह्लाद जोशी यांनी कॉंग्रेस नेते मनीष तिवारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासमवेत बैठक घेतली, पण तरीही सभागृहात गोंधळ सुरूच राहिला.

    विरोधकांच्या हाती नवीन मुद्दा

    19 जुलैपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात केवळ गोंधळच झालेला दिसून आला आहे. गेल्या आठवड्यात पेगॅसस हेरगिरी आणि ‘ऑक्सिजनच्या अभावी एकही मृत्यू नाही’ हे मुद्दे चर्चेत राहिले. त्याचबरोबर शुक्रवारी राज्यसभेत तृणमूलचे खासदार शांतनु सेन यांना या अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजातून निलंबित करण्यात आले. यानंतर विरोधकांनी हाच नवीन मुद्दा बनवला आहे.

    monsoon session proceedings of the house adjourned 8 times two bills passed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य