विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रीग प्रकरणात आपल्याला मुद्दामून निवडणुकीच्या तोंडावर अटक करण्यात येत आहे, असा कांगावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीने चालवला आहे. पण प्रत्यक्षात केजरीवाल यांना कितीतरी आधीपासून याच मनी लॉन्ड्रीग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ने समन्स पाठवणे चालू केले होते, पण त्या प्रत्येक समस्या वेळी केजरीवाल यांनी कोणता ना, कोणता बहाणा करून चौकशी आणि तपासाला सामोरे जाणे टाळले. money laudring case arvind kejariwal ED Arrest?
ED ने केजरीवाल यांना एक-दोन नव्हे, तर तब्बल 9 समन्स पाठवली होती. परंतु, त्यापैकी एकही समन्सच्या वेळी केजरीवाल ED च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. प्रत्येक वेळी कोर्टात जाऊन किंवा कुठले ना कुठले तरी कारण सांगून ते चौकशीला हजर राहण्यास टाळत होते.
आज दिल्ली हायकोर्टाने केजरीवाल यांचा अर्ज फेटाळला. त्यांना चौकशी आणि तपासाला सामोरे जायला सांगितले. त्यावेळी कायदेशीर प्रक्रियेच्या आधारेच ईडीची टीम त्यांच्या घरी पोहोचली आणि त्यांची चौकशी सुरू केली.
– रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात
केजरीवालांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असून त्यांच्या घरासमोर त्याचबरोबर दिल्लीमध्ये संवेदनशील भागांमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आला आहे. दिल्लीचे मंत्री सुरेश भारद्वाज केजरीवाल यांच्या घरात हजर आहेत.
अरविंद केजरीवाल यांना चौकशी आणि तपासासाठी ईडीने एक दोन नव्हे, तर तब्बल 9 समन्स पाठवली होती. परंतु, केजरीवाल यांनी प्रत्येक समन्सच्या वेळी कुठला ना, कुठला तरी बहाणा करत चौकशी आणि तपासाला सामोरे जाण्याचे टाळले होते. आज दिल्ली हायकोर्टाने त्यांच्या या टाळण्याची दखल घेऊन त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला. त्यामुळे ईडीची टीम ताबडतोब केजरीवाल यांच्या घरी हजर झाली. त्यांची चौकशी सुरू केली आणि त्याचवेळी त्यांच्या घराबाहेर तसेच दिल्लीतील संवेदनशील भागांमध्ये रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात केला.
यापूर्वी केजरीवाल यांनी न्यायालयाला सांगितले होते की, ते अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहण्यास तयार आहेत. तपास यंत्रणा त्यांना अटक करणार नाही, याची खात्री त्यांना दिली पाहिजे.
त्याचवेळी हायकोर्टाने ईडीला उत्तर देण्यास आणि नवीन अंतरिम याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. आता या प्रकरणी 22 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली उच्च न्यायालयाचे खंडपीठ गुरुवारी केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. मद्य घोटाळाप्रकरणी आजच ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले आहे. 17 मार्च रोजी त्यांना 9वे समन्स पाठवण्यात आले होते.
केजरीवाल यांनी 19 मार्च रोजी या समन्सविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर 20 मार्च रोजी सुनावणी झाली. कोर्टाने समन्स पाठवण्यासाठी ईडीला वारंवार बोलावले आहे. तपास यंत्रणेला बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल यांना 27 फेब्रुवारी, 26 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 17 जानेवारी, 3 जानेवारी आणि 2023 मध्ये 21 डिसेंबर आणि 2 नोव्हेंबर रोजी समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, ते एकदाही चौकशीसाठी गेले नाहीत.
सीएम सुरक्षा मिळाल्यास हजर होतील
20 मार्च रोजी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि विक्रम चौधरी यांनी केजरीवाल यांची बाजू न्यायालयात मांडली. ते म्हणाले- ईडीने आप नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक केली आहे. तपास यंत्रणा केजरीवाल यांनाही अटक करू शकते.
वकील म्हणाले- केजरीवाल पळून जात नाहीत. त्यांना सुरक्षा दिली तर ते पुढे येतील. जरी ईडी त्याला आरोपी, संशयित किंवा साक्षीदार म्हणून बोलावत आहे की नाही हे सांगत नाही. त्यावर न्यायालयाने म्हटले होते की, ते हजर झाल्यावरच समजेल की त्यांना आरोपी म्हणून बोलावले जात आहे की साक्षीदार म्हणून.
ED ने 17 मार्च रोजी केजरीवाल यांना दिल्ली जल बोर्ड टेंडर घोटाळा प्रकरणात मद्य धोरण घोटाळा प्रकरणासह समन्स पाठवले होते. जल बोर्ड टेंडर घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना मिळालेले हे पहिले समन्स आहे. याप्रकरणी त्यांना 18 मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र ते गेले नाहीत. अशाप्रकारे ईडीने केजरीवाल यांना आतापर्यंत 9 समन्स पाठवली.
‘आप’ने ईडीचे समन्स बेकायदेशीर म्हटले
18 मार्च रोजी दिल्ली जल बोर्ड प्रकरणात केजरीवाल हजर झाले नाहीत, तेव्हा ‘आप’ने ईडीचे समन्स बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांना कोर्टातून अंतरिम जामीन मिळाला असताना पुन्हा पुन्हा समन्स का पाठवले जात आहेत, असे आप म्हणाले. ईडीच्या माध्यमातून भाजप केजरीवालांना लक्ष्य करत असल्याचा आरोप आपने केला आहे.
money laudring case arvind kejariwal ED Arrest?
महत्वाच्या बातम्या
- CEC नियुक्ती कायद्यावर केंद्राचे उत्तर; पॅनेलमध्ये सरन्यायाधीश असणे म्हणजेच आयोग स्वतंत्र असे नाही
- राजकीय पक्षांच्या मोफत ‘भेटवस्तू’ देण्याच्या आश्वासनांबाबत सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका
- सुरुवातीला पवार गटाची चलती, आता अजितदादांच्या कार्यकर्त्यांची कुरघोडी; युगेंद्र पवारांना घेराव!!
- EDने पंजाबमधील तुरुंगात असलेल्या AAP आमदारासह सहा जणांविरुद्ध दाखल केली फिर्याद