• Download App
    मोहन यादव आणि विष्णू देव साय आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार!|Mohan Yadav and Vishnu Dev Sai will take oath as Chief Minister today

    मोहन यादव आणि विष्णू देव साय आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार!

    • पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची शपथविधी सोहळ्यास असणार उपस्थिती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत आज (बुधवार) मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आयोजित केला जाणार आहे.Mohan Yadav and Vishnu Dev Sai will take oath as Chief Minister today

    भोपाळ येथील मोतीलाल नेहरू स्टेडियमवर आज सकाळी साडेअकरा वाजता डॉ.मोहन यादव मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यादरम्यान राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवरा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.



    याशिवाय छत्तीसगडचे नवनियुक्त मुख्यमंत्री विष्णू देव साय हे देखील शपथ घेणार असून, त्यांच्याबरोबरच दोन उपमुख्यमंत्री आणि 10 कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी रायपूर येथील सायन्स कॉलेज मैदानावर दुपारी 2 वाजता होणार आहे.

    मध्य प्रदेशात राज्यपाल मंगूभाई पटेल नवनियुक्त मुख्यमंत्री आणि इतरांना शपथ देतील. नव्या मंत्रिमंडळातील उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी सोहळा काही दिवसांनी आयोजित केला जाणार आहे.

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष विष्णुदत्त शर्मा म्हणाले की, शपथविधी सोहळा भव्य आणि ऐतिहासिक असेल. त्यांनी संघटनेचे सरचिटणीस हितानंद आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यक्रमस्थळी सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी डॉ.यादव यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

    Mohan Yadav and Vishnu Dev Sai will take oath as Chief Minister today

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची