विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये ७५ वर्षांचे होणार आहेत. अशावेळी “ते बाजूला होणार का?”, “मोदींना संकेत देणार का?” अशी उत्सुकता होती. पण भागवत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की ते किमान ८० वर्षांपर्यंत पदावर राहू शकतात. यामुळे 75 वर्षांची झाल्यानंतर पंतप्रधान निवृत्ती स्वीकारतील आणि आपल्याला राजकीय अवकाश मिळेल या विरोधकांच्या मनसुब्यांना धक्का बसला आहे Mohan Bhagwat
दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित तीन दिवसांच्या व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेक मुद्द्यांवर विचार व्यक्त केले. 75 वर्षांच्या निवृत्तीचा मुद्दा यात महत्वाचा ठरला. आपण स्वतःच 75 वर्षांची झाल्यावर निवृत्ती घेणार नाही संघाने इच्छा व्यक्त केली तर 80 वर्षांपर्यंत काम करू असे सांगून मोदींच्या नेतृत्वावर कुठलेही प्रश्नचिन्ह नाही. २०२९ पर्यंत भाजपचे नेतृत्व मोदींकडेच राहील, हा ठाम संदेश दिला गेला.
कार्यक्रमाच्या पहिल्या दोन दिवसांत मुस्लिम नेत्यांना भागवत यांचे सूर काही प्रमाणात सकारात्मक वाटले. त्यांनी समेट, सौहार्द आणि एकत्रितपणे काम करण्याची भाषा केली. मात्र तिसऱ्या दिवशी प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी कोणताही मुद्दा टाळला नाही. मुस्लिम नेत्यांनी तरीही सावध प्रतिक्रिया दिली, कारण त्यांना भाषण आणि प्रत्यक्ष कृती यात फरक जाणवतो, हे स्पष्ट होतं.
RSS आणि BJP यांच्यात मतभेद अधूनमधून होतात, हे भागवत यांनीही कबूल केले. पण त्याचवेळी RSS ने कधीही इतका प्रभाव उपभोगलेला नाही. शिक्षणक्षेत्र, राज्यपाल, कुलगुरू अशा अनेक पातळ्यांवर RSS चे लोक पोहोचले आहेत.
RSS च्या अजेंड्यांची अंमलबजावणी झाली आहे: राम मंदिर, समान नागरी संहिता चर्चेच्या केंद्रस्थानी, राष्ट्रीय सुरक्षा व हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरील पावले. त्यामुळे RSS ला सध्याच्या राजकीय समीकरणात समाधान मिळाले आहे.
यंदा स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी RSS चे कौतुक केले होते. हे महत्त्वाचे कारण RSS आणि BJP मध्ये विश्वासाचे नवे समीकरण तयार झाले असल्याचे मानले जाते. यामुळे मोदींचं पुढील नेतृत्व सुरक्षित राहील, हे पुन्हा अधोरेखित झाले.
भागवत यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांबाबत कडक भूमिका घेतली. तसेच केंद्राने सादर केलेल्या १३० व्या घटनादुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिला, ज्यात मंत्र्यांना ३० दिवस तुरुंगवास झाल्यास राजीनामा द्यावा लागेल.
त्याचबरोबर, हिंदू सणांवर मांस न खाणे हा एक प्रकारचा सौहार्दाचा भाग मानता येईल असेही त्यांनी म्हटले. या विधानातून त्यांनी BJP च्या भूमिकेला छुपा पाठिंबा दिला.
BJP च्या पुढील अध्यक्षपदावरही संघाचा मतप्रवाह महत्त्वाचा राहणार आहे, हे भागवत यांच्या एका वाक्यातून स्पष्ट झाले. “जर आम्ही ठरवलं असतं तर इतका वेळ लागला असता का?” असा त्यांनी केलेला विनोद याच दिशेने होता. बिहार निवडणुकीनंतरच नवा अध्यक्ष जाहीर होईल, असा संकेत मिळाला.
Mohan Bhagwat message: Modi’s leadership is secure till 2029
महत्वाच्या बातम्या
- Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड
- Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले
- Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!
- Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित