• Download App
    Mohammed yunus एकीकडे हिंदूंची हात जोडून माफी

    Mohammed yunus : एकीकडे हिंदूंची हात जोडून माफी; दुसरीकडे जिहादी कट्टरतावाद्यांची सुटका; मोहम्मद युनूस सरकारची “डबल गेम”!!

    बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली जमाते इस्लामी, बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी आणि अन्य कट्टरपंथी संघटनांनी सत्ता हस्तगत केली. सरकारचा चेहरा मात्र मोहम्मद युनूस (Mohammed yunus) यांच्यासारखा नोबेल विजेत्याचा ठेवला. मात्र, त्याचवेळी हिंदू समाजावर जिहाद्यांनी अत्याचार केले. शेकडो हिंदूंची हत्या केली. हजारो घरे, मंदिरे पेटवली. हिंदू महिलांवर बलात्कार केले. त्याचे पडसाद जगभर उमटले. लाखो हिंदू बांगलादेशात रस्त्यावर आले. हिंदूंचा हा संताप सरकारला बराच जड जाईल हे लक्षात येताच मोहम्मद युनूस संतप्त हिंदू युवकांना भेटले. त्यांच्याशी चर्चा केली. युनूस यांच्या सरकारचे गृहमंत्री रिटायर्ड ब्रिगेडियर सखावत हुसेन यांनी हिंदू समाजाची हात जोडून माफी मागून टाकली. पण हिंदूंचे झालेले नुकसान भरून कोण आणि कसे देणार??, यावर दोघांनी चकार शब्दही काढला नाही.

    इकडे भारतातून शरद पवारांनी मोहम्मद युनूस यांना ते सेक्युलर असल्याचे सर्टिफिकेट देखील देऊन टाकले. पण हेच मोहम्मद युनूस बांगलादेशात हिंदूंवर हल्ले आणि अत्याचार होत असताना बांगलादेशात नव्हते, तर पॅरिस मध्ये होते. त्यांनी पॅरिस मधून शेख हसीना यांच्यावर सतत टीकास्त्र सोडले होते. पण हिंदूंवरच्या हल्ल्यांचा त्यांनी साधा निषेध देखील केला नव्हता. पण आता हिंदूंचा संताप जड जाईल. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा दबाव सहन करावा लागेल हे लक्षात येताच हात जोडून सरकारी माफीचे नाटक रंगवले गेले.


    मविआचा मुख्यमंत्री कोण??; पृथ्वीराज बाबांचे मत दुर्लक्षित करण्यासारखे नाही; पवारांची कबुली!!; पण ती का द्यावी लागली??


    एकीकडे हिंदूंची हात जोडून माफी मागणाऱ्या याच मोहम्मद युनूस  (Mohammed yunus ) यांच्या अंतरिम सरकारने बांगलादेशातल्या जिहादी कट्टरपंथींयाना दोषमुक्त करून सुटका करण्यास होकार दिला आहे. ज्यांना 10-ट्रक शस्त्रास्त्रे पकडण्यात (उल्फाला पाठवल्या जाणाऱ्या शस्त्रे आणि स्फोटकांची खेप) मध्ये सहभागासाठी मृत्यूदंड देण्यात आला होता, त्यांना दोषमुक्त ठरवून सुटका करण्याचे हे प्रकरण आहे. कायदा आणि संसदीय कामकाज मंत्रालयाचे सल्लागार बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे समर्थक आणि कट्टर भारतविरोधी आसिफ नजरुल यांनी ही सूचना केली आहे. आता हा विषय अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्यापुढे ठेवला जाईल. तो मंजूर करण्याखेरीज त्यांच्यापुढे दुसरा पर्याय देखील नाही. कारण निवडणुका होईपर्यंत तरी मोहम्मद युनूस यांच्याच सल्ल्याने त्यांना चालावे लागणार आहे.

    शिक्षा झालेल्या पण आता दोषमुक्त ठरवलेल्या कैद्यांची प्रमुख नावे :

    1. मो. लुत्फुझ्झमन बाबर : बीएनपी – जमात युती सरकारमधील गृह मंत्रालयाचे राज्यमंत्री (2001-2006),

    2. अब्दुस सलाम पिंटू : उपमंत्री बीएनपी-जमात युती सरकार (2001-2006),

    3. तारिक रहमान : बीएनपीचे कार्यवाहक अध्यक्ष, माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र. (तारिक रहमान आणि राहुल गांधी यांची लंडनमध्ये नुकतीच भेट झाली होती)

    4.मेजर जनरल (निवृत्त) रज्जाकुल चौधरी : बीएनपी-जमात युती सरकारच्या काळात गुप्तचर संचालनालयाचे तत्कालीन महासंचालक (2001-06)

    5. विंग कमांडर (बरखास्त) शहाब उद्दीन : बीएनपी-जमात युती सरकारच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा गुप्तचर विभागाचे तत्कालीन संचालक

    हे सगळे जिहादी कट्टरपंथी आणि भारत विरोधी लॉबीचे घटक आहेत. बांगलादेशी सरकारचा चेहरा जरी मोहम्मद युनूस यांच्या रूपाने नोबेल पुरस्कार विजेता असला, तरी प्रत्यक्षात सत्ता मात्र जमाते इस्लामी आणि बांगलादेश नॅशनल पार्टी या कट्टरपंथीयांच्या हातात गेली आहे. त्यामुळेच कट्टर भारत विरोधकांच्या सुटकेचा प्रस्ताव समोर आला आहे. त्यामुळे हिंदू अंगावर आले म्हणून मोहम्मद युनूस सरकारच्या गृहमंत्र्यांनी जरी हात जोडून माफी मागितली असली तरी दुसरीकडे जिहादी कट्टरपंथीयांची सुटका करून सरकारने डबल गेम खेळल्याचे उघड्यावर आले आहे.

    Mohammed yunus double game, while apologising Hindus, he released jihadi elements in Bangladesh

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य