विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेला संबोधित करण्याच्या निमित्ताने भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहम्मद युनूस ( Mohammed yunus ) अमेरिका दौऱ्यावर आहेत. परंतु, बांगलादेशातील हिंसाचाराच्या घडामोडी आणि हिंदूंवरच्या अत्याचाराबाबत उत्तरे द्यायला लागतील, या भीतीपोटी नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरची बैठक टाळली.
मोदी आणि मोहम्मद युनूस हे दोन्ही नेते अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी गेले आहेत. परंतु त्यांची एकत्रित बैठक आयोजित करणे शक्य होते. तसा विशिष्ट वेळ दोन्ही देशांच्या प्रमुखांना काढता आला असता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याशी बोलताना बांगलादेशातील हिंदूंवरच्या अत्याचाराचा मुद्दा काढतील आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आपल्याला उत्तरे द्यावी लागतील, हे लक्षात घेऊन मोहम्मद युनूस आणि त्यांच्या टीमने मोदींबरोबरची युनूस यांची भेटच टाळली. त्याऐवजी मोहम्मद युनूस फक्त परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याबरोबरच्या द्विपक्षीय बैठकीत सामील होतील.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांच्या एकत्रित बैठकीच्या वेळा जुळत नसल्याचे कारण देऊन पंतप्रधान मोदी आणि मोहम्मद युनूस यांच्यात भेट होणार नसल्याचे सांगितले. त्याऐवजी जयशंकर आणि युनूस यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार असल्याकडे बोट दाखवून वेळ मारून नेली.
Mohammed yunus avoids to meet Modi in USA
महत्वाच्या बातम्या
- PM Vishwakarma Yojana : पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
- Nitesh Rane : वड्याचे तेल वांग्यावर; राष्ट्रवादीकडून नवाब मलिक प्रकरणाची आगपाखड नितेश राणेंवर!!
- Rameshbhai oza : आपले कार्य उपकार नाही, तर साधना : रमेशभाई ओझा; वनवासी कल्याण आश्रमाचे हरियाणात राष्ट्रीय कार्यकर्ता संमेलनाचे उद्घाटन
- Hezbollah : पेजर-वॉकी-टॉकी स्फोटानंतर, हिजबुल्लाच्या गडावर आणखी एक हल्ला