बांगलादेशाने पाकिस्तानला करून दिली 1971 ची आठवण!! Mohd Yunus
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Mohd Yunus बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली इस्लामी जिहादींनी सत्ता हस्तगत करून मोहम्मद युनूस यांच्यासारख्या नोबेल पुरस्कार विजेत्या अर्थशास्त्रज्ञाचा चेहरा सरकारप्रमुख म्हणून जगासमोर आणला. त्यातून बांगलादेशची उदारमतवादी प्रतिमा राखायचा प्रयत्न केला. पण बांगलादेशात झालेल्या हिंदूंवरच्या अत्याचारामुळे त्या देशाची जी प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर डागाळायची होती, ती डागाळलीच. मोहम्मद युनूस यांच्या तथाकथित उदारमतवादी चेहऱ्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर तरी फारसा फायदा झाल्याचे दिसले नाही.
उलट संयुक्त राष्ट्र संघाच्या दौऱ्यात मोहम्मद युनूस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणे टाळले. त्याऐवजी त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी औपचारिक चर्चा केली. या बातम्या जागतिक प्रसार माध्यमांनी अधोरेखित करून दिल्या. Mohd Yunus
त्यात मोहम्मद युनूस यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. म्हणजे एकीकडे मोदींची भेट टाळली, पण पाकिस्तानी पंतप्रधानांना ते आवर्जून भेटले ही बाब आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकांना खटकली.
या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी बांगलादेशच्या परराष्ट्र खात्याचे सल्लागार मोहम्मद तौहीद हुसेन पुढे आले. त्यांनी पाकिस्तानला 1971 च्या अत्याचाराबद्दल संपूर्ण बांगलादेशाची माफी मागायला सांगितले. पाकिस्तानी पंतप्रधानांची मोहम्मद युनूस यांनी केलेली चर्चा औपचारिक स्वरूपाची होती. ती एक शिष्टाचार भेट होती. त्या पलीकडे काही नव्हते. बांगलादेशाची जनता 1971 चे अत्याचार विसरलेली नाही. त्याबद्दल पाकिस्तानने बांगलादेशची जाहीर माफी मागावी. त्यानंतर पाकिस्तान बरोबर बांगलादेशचे संबंध सुधारण्याबाबत विचार होऊ शकतो, असे वक्तव्य मोहम्मद हुसेन यांनी केले. मात्र त्यात डॅमेज कंट्रोलच्या प्रयत्नांखेरीज दुसरे काहीही नव्हते. Mohd Yunus
Mohammad Yunus talks to Pakistani Prime Minister in New York
महत्वाच्या बातम्या
- Dushyant Chautala : हरियाणा दुष्यंत चौटाला अन् खासदार चंद्रशेखर यांच्या ताफ्यावर दगडफेक
- नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल
- Tirupati Laddu : तिरुपती लाडूतील ‘भेसळयुक्त तुपा’बाबत SITच्या तपासाला स्थगिती
- Amit shah : माध्यमांनी चालवला 2029 चा बोलबाला; प्रत्यक्षात अमित शाहांनी दिला व्होट जिहादवर मात करायचा फॉर्म्युला!!