Saturday, 10 May 2025
  • Download App
    Mohammad Yunus मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना यांना सुनावले, म्हणाले...

    Mohammad Yunus : शेख हसीनांना सुनावताना मोहम्मद युनूस यांची भारतालाही दमबाजी!!

    Mohammad Yunus

    बांगलादेश भारतासोबतच्या मजबूत संबंधांना महत्त्व देतो, पण … असं युनूस म्हणाले आहेत Mohammad Yunus scolded Sheikh Hasina

    विशेष प्रतिनिधी

    ढाका : बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. मुहम्मद युनूस म्हणाले की, शेख हसीना यांनी भारताबाबत राजकीय भाष्य करणे हा मित्रत्वाचा भाव नाही. बांगलादेशात त्या परत येईपर्यंत दोन्ही देशांची गैरसोय होऊ नये म्हणून त्याने मौन बाळगावे.

    ते म्हणाले की, बांगलादेश (सरकार) त्यांना परत घेईपर्यंत भारताला त्यांना ठेवायचे असेल तर त्यांना गप्प बसावे लागेल अशी अट असेल. बांगलादेश भारतासोबतच्या मजबूत संबंधांना महत्त्व देतो, पण नवी दिल्लीनेही हे संबंध कायम ठेवण्याचा विचार केला पाहिजे. भारताने शेख हसीना यांचे ते वक्तव्य टाळावे ज्यात त्यांनी शेख हसीना यांच्याशिवाय बांगलादेशाचे अफगाणिस्तानात रूपांतर होईल, असे म्हटले होते.


    Eknath Shinde : एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून ‎शेतकऱ्यांना भरपाई देणार, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा


    दरम्यान, शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि देश सोडल्यानंतर बांगलादेशात हिंदूंसह अल्पसंख्याकांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. आता हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन शिक्षकांना जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले जात असल्याची प्रकरणं समोर आली आहेत.

    द डेली स्टारच्या वृत्तानुसार, बांगलादेश छात्र ऐक्य परिषदेने जातिया प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हा खुलासा केला. संघटनेचे समन्वयक साजिब सरकार म्हणाले की, हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यापासून धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याक हिंसाचाराचे बळी ठरत आहेत. बांगलादेश छात्र ऐक्य परिषद ही बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन ओक्य परिषदेची विद्यार्थी शाखा आहे.

    Mohammad Yunus scolded Sheikh Hasina

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    BSF : बीएसएफने पाकिस्तानचे अनेक दहशतवादी लाँच पॅड केले उद्ध्वस्त

    Operation sindoor : सियालकोट, चकलाला यांच्यासह 7 पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर भारताचे हल्ले; ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानचे दावे खोटे!!

    Pakistani terrorists : BSF ने 7 पाकिस्तानी दहशतवाद्यांना केले ठार; S400-आकाशने पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले