वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोप बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात काही मुद्द्यांवरून भाजप नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची जशी कानउघडणी केली आहे, तसाच प्रसार माध्यमांनाही टोला हाणला आहे.Modi’s warning to BJP leaders; But the media too
भाजपच्या नेत्यांनी सिनेमा विषयक अनावश्यक वक्तव्ये टाळावीत. अनावश्यक वाद करू नयेत. वाद निर्माण झाले असल्यास त्यावर अनावश्यक प्रतिक्रियाही देऊ नये. कारण आपण गांभीर्याने दिवसभर काम करतो. पण माध्यमे मात्र सिनेमाचे वादच उकरून ते दिवसभर दाखवत राहतात, अशा शब्दात मोदींनी भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे, तर माध्यमांना टोला हाणला आहे.
पंतप्रधान मोदींनी आपली नाराजी व्यक्त करताना, एकीकडे पक्षाचे मोठे नेते दिवसरात्र काम करत असताना काही लोक सिनेमांबद्दल वक्तव्ये करतात. त्यामुळे पूर्ण दिवस टीव्ही आणि प्रसारमाध्यमांवर तेच सुरू राहते. महत्त्वाच्या कामाकडे आहे बातम्यांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आपल्या नेत्यांनी अनावश्यक वक्तव्ये करणे टाळले पाहिजे, अशा शब्दांमध्ये मोदींनी नेत्यांना समज दिली. मुस्लिम समाजाबद्दल अनावश्यक वक्तव्ये करू नये, असा सल्लाही मोदींनी दिला आहे.
मागच्या महिन्यात ‘पठाण’ चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ गाणं प्रदर्शित झाल्यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या चित्रपटामध्ये काही वादग्रस्त दृश्य आहेत, असं म्हटलं होतं. ही दृश्य काढून टाकली नाही तर ‘पठाण’ चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही असेही मिश्रा म्हणाले होते. त्यानंतर सेन्सॉर बोर्डने ‘पठाण’च्या निर्मात्यांना काही दृश्यांमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला होता. या निर्णयाचं मिश्रा यांनी स्वागत केले होते.
महाराष्ट्र भाजपाचे नेते आणि आमदार राम कदम यांनी निर्मात्यांना प्रश्न विचारताना हे सारं प्रसिद्धीसाठी केले की यामागे काही कट होता असे वक्तव्य केले होते. महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या आदर्शावर चालणारे भाजपा सरकार आहे. त्यामुळे सरकारने हिंदुत्ववाद्यांच्या भावानांचा अपमान करणाऱ्या चित्रपटांबरोबर मालिकांवर बंदी घालावी, अशी मागणी राम कदम यांनी केली होती.
पंतप्रधान मोदींनी याच वादाकडे अंगुली निर्देश करत असे कोणतेही वाद अनावश्यक निर्माण करू नयेत आणि निर्माण झाले असल्यास त्याला खतपाणी घालू नये, असा इशारा भाजपचा नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.
Modi’s warning to BJP leaders; But the media too
महत्वाच्या बातम्या