• Download App
    Italian Prime Minister

    EU ने भारतावर टेरिफ लादण्यासाठी ट्रम्प प्रशासनाची धमकी; पण मोदींची चर्चा इटलीच्या पंतप्रधानांशी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतावर अमेरिकी पाठोपाठ युरोपियन युनियन अर्थात EU ने पण ज्यादा टेरिफ लादावेत अशी धमकी ट्रम्प प्रशासनाने दिली. पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीच्या पंतप्रधानांशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील व्यापार करार यशस्वी करण्यास मदत केल्याबद्दल मोदी यांनी मेलोनी यांचे आभार मानले.

    ट्रम्प प्रशासनाने भारताला दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही नेत्यांनी गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, स्पेस, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण आणि दहशतवाद यासारख्या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये असलेल्या करारांबाबत चर्चा केली आणि आगामी काळातील रणनीतीवर प्रकाश टाकला.

    – पाच वर्षांचा कृती आराखडा

    आज दोन्ही नेत्यांनी 2025 ते 2029 या काळालीत धोरणात्मक कृती आराखड्यावर चर्चा करत पार्टनरशीप आणखी वाढवण्याबाबत भाष्य केले. जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत झालेल्या फोन कॉलची माहिती देताना पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी म्हटले की, ” इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. भारत-इटली यांच्यातील धोरणात्मक पार्टनरशीप आणखी मजबूत करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच युक्रेनमधील संघर्ष लवकरात लवकर संपावा याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले. भारत आणि युपोपियन युनियनमधील व्यापार करार पूर्ण करण्यासाठी आणि आयएमईईईईसी उपक्रमाद्वारे कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी इटलीच्या सक्रिय पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मेलोनी यांचे आभार.”



    – जूनमध्ये झाली होती भेट

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांची नेहमीच चर्चा होत असते. कॅनडामध्ये जून महिन्यात जी 7 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली होती. त्यावेळी झालेल्या संभाषणात मेलोनी आणि पंमोदी यांच्यातील मैत्री स्पष्टपणे दिसून आली होती. मेलोनी यांनी म्हटले होते की, ‘पंतप्रधान मोदी हे’बेस्ट’ आहेत. मी त्यांच्यासारखी बनण्याचा प्रयत्न करत आहे.’

    जी 7 शिखर परिषदेत झालेल्या भेटीबाबत दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भेटीबद्दल X वर एक पोस्ट देखील शेअर केली होती. इटलीसोबत भारताची मैत्री आणखी मजबूत होत राहील, ज्याचा आपल्या लोकांना खूप फायदा होईल, असे मोदींनी त्यात नमूद केले.

    Trump administration threatens to impose tariffs on India by EU, Modi’s talks with Italian Prime Minister

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka Government : कर्नाटक सरकारने म्हटले- राष्ट्रपती व राज्यपाल हे फक्त नाममात्र प्रमुख; केंद्र व राज्यांतील मंत्रिमंडळाच्या मदत आणि सल्ल्यानुसार कार्य करण्यास बांधील

    Government : 22 सप्टेंबरपासून बिस्किटे-टूथपेस्टसारखी उत्पादने स्वस्त मिळणार; सरकारने कंपन्यांना जुन्या स्टॉकची MRP बदलण्याची परवानगी

    Army Chief : लष्करप्रमुख म्हणाले- सैन्यासाठी आत्मनिर्भर भारत गरजेचा; लोकांनी ऑपरेशन सिंदूरला 4 दिवसांचा कसोटी सामना म्हटले