विशेष प्रतिनिधी
वाराणसी : ज्यादा मुले पैदा करण्याचा विषय तुम्ही फक्त मुसलमानांशीच का जोडता??, मुस्लिमांवर हा अन्याय का करता??, असा बोचरा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केला. सरकारी योजनांचा लाभ देताना मी कधी हिंदू – मुस्लिम भेदभाव केला नाही इथून पुढेही हिंदू – मुस्लिम करणार नाही. ज्या दिवशी मी हिंदू मुस्लिम भेद करेन, त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनात राहणार नाही, असा निर्वाळा मोदींनी दिला. Modi’s stupid question to the opposition
काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चिरफाड करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस दीन, दलित, आदिवासी, ओबीसी यांचा हक्क मारून त्यांच्या हक्काच्या सवलती ज्यादा मुले पैदा करणाऱ्यांना, देशात बाहेरून येणाऱ्या घुसखोरांना देण्याचे कारस्थान आखात आहे, असा आरोप केला होता. त्यानंतर विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर ते हिंदू – मुसलमान भेद करत असल्याचा आरोप केला. या विषयावर रूबिया लियाकत हिला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी स्पष्ट खुलासा केला.
विरोधकांनी माझ्या त्या वक्तव्याचा हिंदू – मुसलमान भेदाचा अर्थ काढला, तेव्हा मी हैराण झालो. मी सरकारी योजनांचा सगळ्यांना लाभ देताना कुठेही कुठल्याच समाजाशी भेदभाव केला नाही. जो ज्या सरकारी योजनेचा लाभार्थी आहे, त्या प्रत्येकाला 100% लाभ देण्याचा प्रयत्न केला. तिथे कधीच हिंदू – मुसलमान असला भेद केला नाही. सरकारी घरे देताना किंवा बाकी कुठल्याही सवलती देताना माझ्या सरकारने जाती धर्म असा कुठलाही भेदभाव केला नाही, असे मोदींनी स्पष्ट केले.
मूळात ज्यादा मुले पैदा करणे हा विषय तुम्ही फक्त मुसलमानांशीच का जोडता??, मुसलमानांवर हा अन्याय का करता?? वास्तविक जिथे गरीबी आहे, तिथे ज्यादा मुले पैदा करण्याची प्रवृत्ती आहे. तिथे कुठल्या धर्माचा संबंध नाही. तेवढीच मुले जन्माला घाला, जेवढी तुम्ही पालन करू शकाल. मुलांच्या पालनाची सगळी जबाबदारी सरकारवर टाकू नका, एवढेच माझे म्हणणे होते. त्यात मी कुठेही हिंदू किंवा मुसलमान असा शब्दही वापरला नव्हता, असा स्पष्ट निर्वाळा मोदींनी दिला.
Modi’s stupid question to the opposition
महत्वाच्या बातम्या
- चाबहार बंदर संचालनाचा भारत + इराणमध्ये दीर्घकालीन करार; चीनच्या विस्तारवादाला, पाकिस्तानच्या लुडबुडीला चाप!!
- बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदींचे निधन!
- पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज दाखल करताना, 12 राज्यांचे मुख्यमंत्री असणार हजर
- राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी काँग्रेसच्या अटी – शर्ती आत्ताच सांगायची गरज नाही; महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथलांची गुगली!!