वृत्तसंस्था
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठमोठ्या सभा 2014 पासून गाजत आहेत. एकापाठोपाठ एक विक्रम मोडत आहेत. पण गुरुवारी अहमदाबाद मध्ये त्यांचा झालेला रोड शो मात्र सगळे विक्रम मोडून गेला. तब्बल 5 तास चाललेला हा रोड शो 50 किलोमीटरची यात्रा ओलांडणारा ठरला. Modi’s record road show in Ahmedabad
या रोड शो मध्ये मोदींनी अहमदाबाद मधले 13 आणि गांधीनगर मधला 1 असे 14 विधानसभा मतदारसंघ पार केले. तब्बल 10 लाख लोकांनी यात सहभाग नोंदवला.
50 किलोमीटरच्या रोड शो मध्ये मोदींनी 35 ठिकाणी स्टॉप घेतले. ठिकठिकाणी असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाष चंद्र बोस, पंडित दीनदयाळ उपाध्याय आदी महापुरुषांच्या पुतळ्यांचा समावेश होता. मोदींनी नरोडा गावातून संध्याकाळी 5.15 वाजता सुरू केलेला हा रोड शो रात्री 9.05 वाजता चांदखेडा येथे थांबला.
या भव्य आणि विक्रमी रोड शो च्या आधी रोड पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंचमहाल जिल्ह्यातील कालोल, छोटा उदेपुर जिल्ह्यातील बोडेली आणि हिंमतनगर मध्ये मोठ्या रॅलींना संबोधित केले होतेच.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख रावण या शब्दाने केला होता. त्याचा मोदींनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. मोदी म्हणाले, मला शिव्या देण्यासाठी काँग्रेसवाल्यांना 2022 च्या विधानसभा निवडणुकीत रावण हा शब्द सापडला. ज्यांनी रामाच्या अस्तित्वावर शंका घेतली, त्यांनी मला रावण म्हटले. या निमित्ताने त्यांनी रामावर विश्वास ठेवायला सुरुवात केली, हे मात्र चांगले झाले, असा टोला मोदींनी लगावला. काँग्रेसवाले जेवढ्या मला शिव्या देतील, जेवढी माझ्यावर चिखलफेक करतील, त्याच चिखलातून जास्तीत जास्त कमळे उगवतील हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला.
Modi’s record road show in Ahmedabad
महत्वाच्या बातम्या