• Download App
    मोदींची स्तुती की दुसरे काही??; अलिगड विद्यापीठाने विद्यार्थ्याची पदवी परत मागितली?, की फक्त बदलायला सांगितली?? । Modi's praise or something else ??; Aligarh University asked for student's degree back? Or just asked to change ??

    मोदींची स्तुती की दुसरे काही??; अलिगड विद्यापीठाने विद्यार्थ्याची पदवी परत मागितली?, की फक्त बदलायला सांगितली??

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशातील अलिगड मुस्लिम विद्यापीठात एक अजबच प्रकार पाहायला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्यामुळे विद्यापीठाने माझी पीएचडीची पदवी परत मागितली आहे, असा दावा दानिश रहीम या पीएचडी प्राप्त विद्यार्थ्याने केली आहे. Modi’s praise or something else ??; Aligarh University asked for student’s degree back? Or just asked to change ??

    त्याला अलिगड मुस्लिम विद्यापीठाने पीएचडीची पदवी दिली होती. पण आता ही पदवी परत मागितली जात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी दानिशने केली आहे. दानिशने या दोन्ही नेत्यांना पत्रे लिहून ही मागणी केली आहे. मात्र विद्यापीठाने केलेल्या खुलाशात त्या विद्यार्थ्याला फक्त डिग्री बदलायला सांगितली आहे कारण ती वेगळ्या प्रकारात की डिग्री त्याला चुकून पाठविण्यात आली आहे, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

    याबाबत दानिश पत्रकारांना सांगितले की, मला 9 मार्च 2021 रोजी ही डिग्री देण्यात आली होती. तर माझी सहकारी मारिया नईमला नोव्हेंबर 2020 मध्ये पीएडीची डिग्री देण्यात आली होती. पीएडी मिळून सहा महिने उलटल्यानंतर आम्हाला विद्यापीठाने 4 ऑगस्ट 2021 रोजी एक पत्र पाठवले आहे. त्यात आम्हा दोघांना चुकून पदवी देण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच या पदव्या परत करण्याचीही सूचना या पत्रामध्ये देण्यात आली आहे.



    पण मला हे पत्र आल्यानंतर खूप आश्चर्य वाटलं आणि धक्काही बसला. मात्र, 22 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधानांचं कौतुक केल्याचे माझ्या लक्षात आले. पंतप्रधानांनी अलिगड यूनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमाला संबोधित केले होते. तेव्हा मी त्यांचे कौतुक केले होते. मीडियाने माझी मुलाखतही दाखवली होती, असे दानिश म्हणाला.

    मी पंतप्रधानांची स्तुती केल्यानंतर मला विद्यापीठाकडून चुकीची वागणूक दिली जाऊ लागली. 8 फेब्रुवारी रोजी माझा वायवा होती. त्यापूर्वी मला चेअरमनने बोलवून घेतले. तू विद्यार्थी आहेस. कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाबत तू अशी उघडपणे भूमिका मांडणे योग्य नाही. राईट विंगचा माणूस असल्या सारखच तू त्या दिवशी बोलत होता, असे चेअरमन मला म्हणाले होते, अशी आठवण त्याने सांगितली.

    त्यावेळी मी चेअरमनला कोणतंही उत्तर दिलं नाही. त्यानंतर मला डिग्री मिळाली. पण आता चुकून डिग्री दिल्याचे सांगितले आहे. याबाबत मी विद्यापीठाला पत्र दिलेआहे. पण त्यावर अजून काही उत्तर आलेले नाही किंवा कार्यवाहीही झाली नाही. त्यामुळे मी नाईलाजाने कोर्टात धाव घेतली आहे. पीएम आणि सीएमलाही पत्रे लिहिली आहेत. विद्यापीठाने विद्यार्थ्याच्या आयुष्याशी खेळू नये. विद्यापीठाने माझ्याविरोधात षडयंत्र रचले आहे. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असेही त्याने सांगितले.

    – विद्यापीठाचा खुलासा

    दानिशने केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. त्याने भाषा विज्ञान विभागातून एलएएम अभ्यासक्रमासाठी एमए आणि पीएचडी केली आहे. त्या विभागाकडून भाषा विज्ञानाची पीएचडी पदवी प्रदान केली जाते. मात्र, त्याने एलएएममध्ये एमए केले आहे. तर त्यांना एलएएममध्ये पीएचडीची पदवी मिळायला हवी. चुकून या विद्यार्थ्याला भाषा विज्ञानातील पीएचडी पदवी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याला डिग्री बदलण्यास सांगितले आहे, असे विद्यापीठाचे प्रवक्ते सैफी किडवई यांनी स्पष्ट केले आहे.

    Modi’s praise or something else ??; Aligarh University asked for student’s degree back? Or just asked to change ??

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच’, युद्धबंदी दरम्यान भारतीय हवाई दलाचे मोठे विधान

    Understand Geo politics : अमेरिकन प्रेसने पसरविले भारत विरोधी narrative; पण प्रत्यक्षात भारताचे पाकिस्तान वरले हल्ले अचूक आणि assertive!!

    PM Modi : ऑपरेशन सिंदूरबद्दल पी. चिदंबरम यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक