विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अखंड भारताच्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानच्या भूभागातून धार्मिक आधारावर छळ झालेल्या हिंदू, जैन, बौद्ध, शीख, पारशी आदी शरणार्थींना भारताचे नागरिकत्व प्रदान करणारा CAA कायदा आज केंद्रातील मोदी सरकारने संपूर्ण देशभर लागू केला. 2024 लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर CAA कायदा लागू केल्याने मोदींची एक गॅरंटी पूर्ण झाली, पण विरोधकांचा तिळपापड झाला आहे. Modi’s guarantee complete before Lok Sabha elections; CAA implemented across the country
केंद्रीय गृह मंत्रालयाने आज 11 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजता (MHA) आज, नागरिकत्व (सुधारणा) कायदा, 2019 (CAA-2019) अंतर्गत नियम अधिसूचित केला आहे. नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2024 नावाचे हे नियम CAA-2019 अंतर्गत पात्र असलेल्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व मंजूर करण्यासाठी अर्ज करण्यास सक्षम करतील. अर्ज पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने सबमिट केले जातील ज्यासाठी एक वेब पोर्टल सुरू केले गेले आहे.
संपूर्ण देशभर CAA लागू केल्याबरोबर, ज्या शाहीनबागेत काँग्रेस सह सर्व विरोधकांनी आणि लिबरल्सनी मोठे आंदोलन केले होते, त्या शाहीनबागेत पोलिसांनी फ्लागमार्च काढला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये CAA कायदा लागू होऊ देणार नाही, अशी घोषणा केली. परंतु, प्रत्यक्षात नागरिकत्व कायद्याच्या मूलभूत तरतुदीनुसार कोणत्याही राज्याला स्वतंत्रपणे नागरिकत्व कायदा करता येत नाही, अथवा टाचा स्वतंत्र नागरिकत्व कायदा लागू करणे शक्यही होत नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारने केलेला नागरिकत्व कायदा नाकारण्याचाही कुठल्याही राज्य सरकारला अधिकार नाही. त्यामुळे पश्चिम बंगाल मध्ये देखील ममता बॅनर्जी यांचा विरोध असताना CAA कायदा लागू होणार आहे.
Modi’s guarantee complete before Lok Sabha elections; CAA implemented across the country
महत्वाच्या बातम्या
- बारामतीच्या ज्येष्ठ नागरिक संघात पवारांनी दिली वय वाढल्याची कबुली, पण…!!
- जरांगेंच्या आंदोलनामुळे जेवढी मराठा मतांमध्ये एकजूट, तेवढीच मराठा + इतरांच्या मतांमध्ये फाटाफूट; वाचा आकडेवारी!!
- जम्मू काश्मीर : पुंछमध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट फसला, 7 आयईडी आणि वायरलेस सेट जप्त
- सावरकरांच्या नाशिक जिल्ह्यात यायला राहुल गांधींना “वायनाड” सापडला; आदित्य आणि पवार येणार साथीला!!