2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या EXIT POLL चे निष्कर्ष आल्यापासून काँग्रेस सह सर्व विरोधकांची अस्वस्थता, संताप सगळे बाहेर आले. मोठमोठी बॅनरबाजी देखील झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ध्यानधारणेची टिंगल टवाळी देखील होऊन गेली. पण हे सगळे सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या टीमने 100 दिवसांच्या अजेंड्याची तयारी करण्याचे ब्रेन स्टॉर्मिंग केले. 100 दिवसांचा अजेंडा आणि त्याची अंमलबजावणी निश्चित केली. याविषयी विरोधक आणि प्रसार माध्यमांना भनकही लागली नाही. विरोधक आणि प्रसार माध्यमे एक्झिट पोलचे निष्कर्ष खरे की खोटे ठरविण्यातच मग्न राहिले आणि मोदी पुढे निघून गेले.Modi’s focus on first 100 days agenda, kept no chance of lobbying for ministership
इतकेच काय, पण 2014 पूर्वी जी सरकारी केंद्रात सत्तेवर येत असत ती सत्तेवर येण्याची प्रक्रिया सुरू असताना प्रसार माध्यमांच्या बातम्यांचे रकाने आणि टीव्हीचे सगळे स्क्रीन एका वेगळ्याच विषयाने भरून जात असत. तो विषय म्हणजे, पंतप्रधान कोण होणार??, मंत्री कोण होणार??, मंत्रीपदासाठी दिल्लीचे दौरे कुणी केले??, त्यांना किती वेळा दौरे करावे लागले??, त्यांना पक्षश्रेष्ठींनी भेट दिली का??, दिली तर किती वेळ दिली?? एकाला मंत्रिपदाच्या लॉलीपॉप दाखवून दुसऱ्या कुणी कुणाचा पत्ता कापला?? मंत्रिपदासाठी कुणी, कसे, कुठे लॉबिंग केले??, हे बातम्यांचे विषय असत. त्यासाठी स्थानिक पातळी पासून दिल्लीपर्यंत सगळी तथाकथित “सूत्रे” फिरून धुमाकूळ घालत असत. प्रत्यक्षात दिल्लीचे पक्षश्रेष्ठी स्थानिक किंवा दिल्लीतल्या “सूत्रां”ना धूपही घालत नसत, पण मंत्रिपदासाठी लॉबिंग च्या बातम्या मात्र प्रसार माध्यमांमध्ये भरभरून वाहत असत.
2014 नंतर मात्र या मंत्रिपदाच्या लॉबिंगच्या बातम्या प्रसार माध्यमांतून सुरुवातीला गायब झाल्या आणि नंतर त्या पूर्ण अस्तंगतच होऊन गेल्या. काँग्रेस किंवा काँग्रेसी विचारसरणीच्या सरकारांच्या राजवटीत जी भोके बोट घालून प्रसार माध्यमे रुंद करून बातम्या काढत असत आणि त्या “एक्सक्लुझिव्ह” म्हणून चालवत असत, ती सगळी भोके मोदी सरकारने पूर्ण बंदच करून टाकली. किंबहुना कायमची बुजवून टाकली. त्यामुळे सरकार मधले कुठले “सोर्सेस”च माध्यमांना उपलब्ध होईनासे झाले. माध्यमांमध्ये कितीही वरिष्ठ असोत, कितीही कितीही “टॉप बॉसेस” असोत, कुणालाही मोदी सरकारमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग करायला वावच उरलेला नाही. किंबहुना तो वाव स्वतः मोदींनीच शिल्लकच ठेवला नाही.
त्यामुळेच मध्यंतरी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये इंडिया टुडेचे प्रमुख अरुण पुरी यांनी मोदींसमोरच एक तक्रार केली होती. मोदी सरकार मधून कुठलीच बातमी “लीक” होत नाही. गव्हर्नर कुणाला नेमणार??, मंत्री कोणाला करणार??, यांची नावे प्रसार माध्यमांना मिळत नाहीत. त्यामुळे प्रसार माध्यमे मंत्रिपदाचे लॉबिंग हा विषयच विसरून गेली आहेत. अरुण पुरींच्या तक्रारीमध्ये 100 % तथ्य होते, पण त्यामध्ये प्रत्यक्षात तक्रारीपेक्षा मोदी सरकारच्या मजबूत बांधबंधिस्तीचेच वर्णन होते.
त्यामुळेच मोदी सरकारमधून कुठलीच मंत्रिपदाच्या लॉबिंगची बातमी “लीक” होत नाही आणि ती प्रसार माध्यमांना मिळत नाही. त्यामुळे मोदींचे मंत्री नेमके कोण होणार??, मोदी कोणाचा पत्ता कापणार?? कोणत्या प्याद्याचा फर्जी होणार??, याच्या बातम्या किंवा विश्लेषण कोणालाही करता येत नाही. मोदी सरकारमध्ये निरा राडिया टेप सारखे प्रकरण उद्भवत नाही किंवा एखाद्यावर एखाद्याच्या मंत्रिपदासाठी कुठली “बरखा” बरसत नाही किंबहुना “ती” बरसू शकत नाही, ही “राजदीपी मीडिया”ची खंत असली तरी त्याला इलाज नाही!!
मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाचे लॉबिंग यापेक्षा मोदी सरकारचा अजेंडा हाच चर्चेचा विषय राहावा यावरच मोदी भर देतात. तसाच भर त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दिला आहे. आपलेच सरकार येणार आहे त्यामुळे पुढच्या 100 दिवसांमध्ये नेमके काय करायचे??, याचा अजेंडा निश्चित आहे, हे मोदींनी अनेक वेळा भर जाहीर सभांमधून सांगितले होते. एक्झिट पोलचे निष्कर्ष आल्याबरोबर मोदी आणि त्यांची टीम कामाला लागली. 100 दिवसांचा नेमका अजेंडा, ज्याचे विषय आधीच पक्के झाले होते, त्याच्या अंमलबजावणीची त्यांनी चर्चा केली.
गरीब, महिला, युवक आणि शेतकरी
अर्थातच त्यामुळे मोदी यांनी आधीच जाहीर केलेल्या देशातल्या 4 जातींसाठी पहिल्या 100 दिवसांमध्ये मोदी काय करणार??, याची उत्सुकता निर्माण झाली. या देशांमध्ये गरीब, महिला, युवक आणि शेतकरी या चारच जाती आहेत आणि त्यांच्या कल्याणासाठी आपले सरकार निरंतर काम करत राहील, असे मोदींनी प्रचारादरम्यान वारंवार सांगितले होते. मोदींच्या सर्व समावेशक हिंदुत्वाला छेद देण्यासाठी राहुल गांधी आणि बाकीच्या सगळ्या विरोधकांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे आणला होता. त्या मुद्द्याला प्रतिछेद देण्यासाठी मोदींनी देशातल्या गरीब, महिला युवक आणि शेतकरी या 4 जातींचा मुद्दा पुढे आणून तो आपल्या कोअर अजेंड्यामध्ये समाविष्ट केला. त्यामुळे आता प्रत्यक्ष निकाल लागून सरकार आल्यानंतर मोदी गरीब, महिला, युवक आणि शेतकरी या 4 जातींसाठी नेमक्या पहिल्या 100 दिवसांमध्ये कोणत्या कल्याण योजना राबविणार??, याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
– योजनांचा विस्तार कसा??
स्टार्टअप, मेक इन इंडिया, संरक्षण दलांची सिद्धता, अग्निवीर योजना या मोदींच्या मोदी सरकारच्या सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण योजना आहेत. या योजनांचा विस्तार मोदी सरकार किती आणि कसा करणार?? धोरणात्मक महत्त्वपूर्ण बदल कोणते होणार आणि त्यासाठी 100 दिवसांमध्ये या योजनांचा पाया कसा रचला जाणार?? याविषयीच्या देशाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मोदी पहिल्या 100 दिवसांमध्ये या विषयांसंदर्भात कुठला धमाका करणार??, याकडे देशाचे डोळे लागले आहेत.
Modi’s focus on first 100 days agenda, kept no chance of lobbying for ministership
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल आज तिहार तुरुंगात शरण येणार; जामीन अर्जावर 5 जूनला निर्णय; ईडीने म्हटले- त्यांचा तब्येतीचा दावा खोटा
- सरकारने मे महिन्यात GST मधून जमवले ₹ 1.73 लाख कोटी; दुसरे सर्वात मोठे संकलन
- 2024 Exit Poll : नेहरूंच्या हॅटट्रिकची बरोबरी करण्यासाठी मोदींना पूर्व + उत्तर + दक्षिण भारतातून मोठी रसद!!
- EXIT POLL 2024 चा महाराष्ट्रातला निष्कर्ष; काही बोचरे प्रश्न!!