वृत्तसंस्था
कारगिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच आपले दिवाळी सीमेवरच्या जवानांबरोबर साजरी करतात. यंदा 2022 मधली कोरोना मुक्त दिवाळी त्यांनी कारगिल मधल्या जवानांबरोबर साजरी केली. Modi’s Diwali with jawans in Kargil
यंदाच्या दिवाळीत स्वदेशीचा बोलबाला खूप आहे. पंतप्रधान मोदींनी देखील जवानांना एक खुशखबर देत भारतीय सैन्य दलासाठी लागणाऱ्या तब्बल 400 हून अधिक वस्तूंची युद्ध सामग्री मेड इन इंडिया आहे. मेक इन इंडिया योजनेला ज्यामुळे मोठा बुस्टर डोस मिळाला आहे, असे सांगितले.
मोदींनी यावेळी कारगिल युद्धाच्या वेळी शहीद झालेल्या जवानांना तेथील युद्ध स्मारकावर जाऊन पुष्पचक्र अर्पित केले. त्याचवेळी मोदींनी तिथल्या जवानांशी मुक्त संवाद साधला. त्यांच्याबरोबर दिवाळीची मिठाई खाल्ली. जवानांनी देखील वंदे मातरम सारखी देशभक्तीपर गीते जाऊन सीमेवरती आपला जज्बा मजबूत आहे हे दाखवून दिले. आपले सरकार कोणत्याही कठीण काळात जवानांच्या पाठीशी कणखरपणे उभे राहील. देशाच्या संरक्षणात कोणतीही कसूर ठेवले जाणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली.
पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारगिल मधल्या दिवाळीची ही क्षणचित्रे :
Modi’s Diwali with jawans in Kargil
महत्वाच्या बातम्या
- गोव्यात नरकासुर दहन; अयोध्येत रामलल्लांचे दर्शन; उज्जैन मध्ये महाकाल पूजन
- कर्नाटकातही हलाल विरोधात आंदोलन जोरावर; हिंदू उतरले रस्त्यावर!!
- नोकरीची संधी : महावितरण विभागात परीक्षेविना केली जाणार निवड, असा करा अर्ज
- CAIT estimate : दिवाळीचा हर्ष, होऊ दे खर्च; भारतीय करताहेत तब्बल 2,50,000 कोटी रुपयांचा आनंद