विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तब्बल सात टक्क्यांमध्ये झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकांचा प्रचाराचा धडाका आज संपला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडी आघाडी यात प्रामुख्याने ही निवडणूक झाली. मोदींच्या अब की बार 400 पारला छेद देण्याचा प्रयत्न इंडी आघाडीच्या नेत्यांनी केला. मोदींच्या प्रचाराच्या धडाक्यातून राहुल गांधींनी भारत जोडो न्यायात्रेपासून सुरू केलेल्या प्रचाराच्या धडाक्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण मोदींचा प्रचार धडाका काही औरच ठरला. Modi’s campaign ends with 80 interviews
7 टप्प्यांमधल्या दमछाक करणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी वयाच्या 74 व्या वर्षी तब्बल 180 रॅली घेतल्या. 60 वेगवेगळ्या मेळाव्यांमध्ये ते सामील झाले. 80 मुलाखती दिल्या. साधारणपणे 207 इव्हेंट मोदींनी कव्हर केले. राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेत 6200 किलोमीटर फिरले. त्याला मोदींनी धडाकेबाज प्रचारातून प्रत्युत्तर दिले.
निवडणुकीच्या काळात इंडी आघाडीचे प्रचाराचे ढोल जोरदार वाजले परंतु आघाडीतल्या कुठल्याच नेत्यांना पंतप्रधान मोदींसारखा धडाकेबाज प्रचार करता आला नाही. महाराष्ट्राचेच उदाहरण द्यायचे झाले तर मोदींच्या महाराष्ट्रात 18 सभा झाल्या, तर राहुल गांधींच्या 2, प्रियांका गांधींच्या 2 आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या 5 अशा सभा झाल्या.
पंतप्रधान मोदींनी आपल्या प्रचाराचा सगळा भर संपूर्ण देशभर ठेवला असला, तरी त्यांनी प्रामुख्याने उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा, महाराष्ट्र, तेलंगण यामध्ये सर्वाधिक रॅली घेतल्या. त्या पाठोपाठ तामिळनाडूमध्ये देखील त्यांनी प्रचारावर भर दिला. मोदींना 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्व आणि दक्षिणेतील राज्यांकडून भाजपच्या मोठ्या यशाच्या आशा आणि अपेक्षा आहेत. गेल्या साधारण दीड वर्षांपासून भाजपने एक विशिष्ट प्रचार मोहीम राबवली. 2019 च्या निवडणुकीमध्ये ज्या 160 जागांवर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होता, त्या मतदारसंघांमध्ये भाजपने विविध मोहिमा राबवून तिथे आपला परफॉर्मन्स उंचावण्याचा प्रयत्न केला. मोदींनी देखील आपल्या प्रचार रणनीतीचा भर या 160 जागांपैकी बहुतांश जागांवर ठेवला होता.
मोदींचा प्रचाराचा धडाका संपल्यानंतर आता ते तामिळनाडूतील कन्याकुमारी दाखल झाले असून त्यांनी सायंकाळी कन्याकुमारी मातेचे दर्शन घेतले. ते उद्या स्वामी विवेकानंद शिलेवर जाऊन ध्यानधारणा करणार आहेत.
Modi’s campaign ends with 80 interviews
महत्वाच्या बातम्या
- युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या देशांना पुतीन यांचा इशारा; ज्या देशाच्या शस्त्रांनी हल्ला, ते गंभीर परिणाम भोगतील
- काशीमध्ये लोकांचा उत्साह प्रचंड; मोदींच्या दिग्विजयात मराठी माणूस भागीदार : देवेंद्र फडणवीस
- मी नार्को टेस्ट क्लियर केली तर अंजली दमानिया घरी बसतील का??; अजितदादांचे प्रतिआव्हान!!
- सांगलीत भीषण दुर्घटना! कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू