• Download App
    राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम Modiji capable of worrying the nation

    राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम – चित्रा वाघ

    • संजय राऊत यांनी राज्याच्या समस्या सोडवाव्यात

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्याच्या समस्या आणि चिंता करावी.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्राची चिंता करण्यासाठी सक्षम आहे, असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितले. Modiji capable of worrying the nation

    पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देशातील तमाम बड्या नेत्यांना देण्यात आलेली सुरक्षा अनाठायी आहे, असा जावईशोध राऊत यांनी लावला आहे, असे त्या म्हणाल्या.

    अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय  प्रश्नांवर अत्यंत परखड भूमिका मोदीजी घेत असतात. अशावेळी त्यांची सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असते,हे आपल्याला कसे समजेल कारण हा विषय खूप मोठा आहे.

    अगोदर राज्याचे सन्माननीय यांची सुरक्षा काढून घ्यावी आणि स्वतःपासून आदर्श घालून द्यावा, असा प्रयोग करायला काय हरकत आहे? गेली दीड वर्ष मुख्यमंत्री हे त्यांचा बराच वेळ मातोश्री निवासस्थानी किंवा वर्षा या शासकीय बंगल्यावरच असतात. ते कुठे फारसे फिरत नाहीत त्यामुळे सध्या त्यांच्या सुरक्षेची तेवढी काळजी नाही.

    तसेही आपले राष्ट्रीय पातळीवरील आस्त्तित्व बिहार निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे जनतेपुढे आलेले आहे. यामुळे आपल्याला मला सांगायचय संजय जी राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम आहेत

    आपण आपले ज्ञान राज्य पातळीवर उपयोगात आणावे. कारण लोकल बंद झाल्यामुळे जनतेची दैनंदिनी बिघडली आहे त्यांना हेलपाटा मारावा लागतोय. जरा जास्त पाऊस पडला तर मुंबईची तुंबई होते या समस्यांवर आपल्या ज्ञानज्योतीचा प्रकाश पाडावा संजयजी.

    Modiji capable of worrying the nation

    •  राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम
    •  बड्या नेत्यांची सुरक्षा अनाठायी : संजय राऊत
    •  गेली दीड वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरीच आहेत
    •  मुख्यमंत्र्यांची सुरक्षा काढण्याचा वाघ यांचा सल्ला
    •  लोकल सेवा बहाल करण्याची मागणी
    •  मुंबईची तुंबई होत असल्याकडे अक्षम्य दुर्लक्ष

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!