• Download App
    मोदी - योगींचे उत्तर प्रदेशात 10-15 दौरे झालेत, प्रश्न उरतो फक्त गरीब पक्षांच्या प्रचाराचा; मल्लिकार्जुन खर्गेंचे टीकास्त्र|Modi - Yogi has made 10-15 visits to Uttar Pradesh, the only question is the propaganda of poor parties; Tikastra of Mallikarjun Kharge

    मोदी – योगींचे उत्तर प्रदेशात १०-१५ दौरे झालेत, प्रश्न उरतो फक्त गरीब पक्षांच्या प्रचाराचा; मल्लिकार्जुन खर्गेंचे टीकास्त्र

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर करताना निवडणूक आयोगाने 15 जानेवारी पर्यंत राजकीय पक्षांच्या मेळाव्यांवर, रॅलींवर, मोटार बाईक रॅलींवर सायकल फेऱ्यांवर बंदी घातली आहे.Modi – Yogi has made 10-15 visits to Uttar Pradesh, the only question is the propaganda of poor parties; Tikastra of Mallikarjun Kharge

    या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. प्रचारावर आलेली बंधने पाहता मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आधीच उत्तर प्रदेशचे 10 – 15 दौरे केले आहेत.



    त्यामुळे सत्ताधारी भाजपला यापेक्षा जास्त प्रचाराची गरज नाही. प्रश्न फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब पक्षांचा आहे. कारण ते मोठे मेळावे घेऊ शकत नाहीत. मोठ्या रॅली आयोजित करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याच प्रचारावर मर्यादा येणार आहे. एक प्रकारे हा सत्तारूढ पक्षाला अनुकूल असाच निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात मोठे दौरे केले हे खरे आहे. परंतु त्याच वेळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशात ठिकाणी “लडकी हूं लढ सकती हूं” यांसारखे उपक्रम अनेक शहरांमध्ये राबवले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरसह अनेक शहरांमध्ये प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी जाहीर सभा घेतल्या आहेत. याकडे मात्र मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे.

    Modi – Yogi has made 10-15 visits to Uttar Pradesh, the only question is the propaganda of poor parties; Tikastra of Mallikarjun Kharge

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Foreign Universities : 15 परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्याची मंजुरी; ऑगस्टपासून पहिली बॅच; परदेशी पदवी मिळेल, शिक्षणाचा खर्च होईल 30-40% कमी

    Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतरवर उपोषणाला सुरुवात केली; NEET पेपरफुटीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

    Prashant Kumar Dutta : आसामच्या माजी डीआयजींची 53 कोटी रुपयांची संपत्ती जप्त; 7.23 कोटी उत्पन्नाच्या तुलनेत 79 कोटींची संपत्ती