गुरुवायूर मंदिरात जाऊनही घेणार दर्शन
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. आज ते गुरुवायूर मंदिरात जाऊन प्रार्थना करणार आहेत. यासोबतच ते राज्यातील 4000 कोटींहून अधिक रकमेच्या विकास योजनांचे उद्घाटनही करणार आहेत.Modi will visit 4000 crore development projects in Kerala today
अयोध्येत अभिषेक होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी मंगळवारी केरळ आणि आंध्र प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर पोहोचले. मंगळवारी संध्याकाळी केरळमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी 1.3 किमी रोड शो केला. त्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक झाली, त्यात लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, बुधवारी केरळमधील गुरुवायूर मंदिर आणि त्रिप्रयार श्री राम मंदिराला भेट देतील आणि प्रार्थना करणार आहेत. यानंतर मोदी कोचीन शिपयार्डशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन करतील, हे प्रकल्प 4000 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आले आहेत.
काल म्हणजेच मंगळवारी पंतप्रधान मोदी आंध्र प्रदेशातील लेपाक्षी येथे गेले होते. जिथे त्यांनी ४८६ वर्षे जुन्या वीरभद्र मंदिरात पूजा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी मंदिरात राम भजन केले. कठपुतळ्यांची रामकथाही पाहिली, ही रामकथा रंगनाथ रामायणावर आधारित होती.
Modi will visit 4000 crore development projects in Kerala today
महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांतून सुरजागड इस्पात गडचिरोलीत करणार 10,000 कोटींची गुंतवणूक!!
- WATCH : काश्मीरची मुस्लिम विद्यार्थिनी बतुल जहरा गाते राम भजन, सांगितले हे खास कारण
- राम भजन म्हणायचे आवाहन केल्यामुळे मल्याळम गायिका चित्रा सोशल मीडिया ट्रोल; पण रामभक्तांचा मिळाला जबरदस्त पाठिंबा!!
- उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषदेचा केला मोठा इव्हेंट; पण सुनावणीत कायद्याचा किस पाडण्यात का गेले फेल??