विशेष प्रतिनिधी
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवरचे सर्वांत मोठे नेते आहेत. ते एक दिवस लक्षद्वीपला गेले, तर मालदीवमध्ये भूकंप झाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींच्या नेतृत्वावर स्तुतीसुमने उधळली. नाशिक मध्ये सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक अनोखे पैलू युवकांना सांगितले. Modi went to Lakshadweep for a day, earthquake in Maldives
एकनाथ शिंदे म्हणाले :
अयोध्येत राम मंदिर बनवून मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण केले आहे. राम मंदिराअगोदर पंतप्रधान मोदींचा दौरा शुभ संकेत आहे. जगात सर्वांत लोकप्रिय पंतप्रधान म्हणून मोदी यांचा उल्लेख करण्यात येतो.
मोदी आहे तर मुमकीन आहे. मोदी एक दिवस लक्षद्वीपला गेले, तर मालदीवला भूकंप आला. जगात मोदींचे नाव आदराने घेतले जाते. मोदींना कोणी कोणी बॉस म्हणतात, तर मोदींसोबत कोणी सेल्फी काढतात. मोदींमुळे देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आपली अर्थ व्यवस्था पोहचली आहे. मोदी देशभक्त राष्ट्रभत नेता आहेत. प्रधानमंत्री झाले हे भाग्यच आहे.
Modi went to Lakshadweep for a day, earthquake in Maldives
महत्वाच्या बातम्या
- विधानसभा अध्यक्षांचा कौल शिंदेंच्या पारड्यात; अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा विरली हवेत!!
- उपराष्ट्रपतींना अयोध्येचे निमंत्रण; आधी वेळ कळवून परिवारासह घेणार श्री रामलल्लांचे दर्शन!!
- या वर्षी दहा पैकी नऊ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग नफ्यात राहण्याची चिन्हं!
- ग्रीस समलिंगी विवाह, दत्तक प्रक्रियेस कायदेशीर मान्यता देणार!