पंतप्रधान मोदी लहान मुलांसोबत खेळतानाच्या व्हिडीओला सोशल मीडियावर प्रचंड शेअर केले जात आहे.
विशेष प्रतिनिधी
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो खूप पसंत केला जात आहे. वास्तविक, व्हिडीओमध्ये पंतप्रधान मुलांसोबत मजा करताना दिसत आहेत. Modi was seen having fun with children showed the fun by sticking a coin on his forehead
मोदींना मुलांबद्दल विशेष प्रेम आहे हे सर्वांनाच माहीत आहे. अनेकदा ते मुलांसोबत मजा करताना किंवा त्यांना प्रोत्साहन देताना दिसतात. मात्र, यावेळी त्याची शैली पूर्वीपेक्षा खूपच वेगळी होती. ते एक रुपयाचे नाणे घेऊन मुलांसोबत मस्ती करताना दिसले.
पंतप्रधान मोदींनी शासकीय निवासस्थानी एका कुटुंबाची भेट घेतली होती. कुटुंबातील दोन मुलेही पंतप्रधानांना भेटण्यासाठी आली होती. तेव्हा पंतप्रधानांनी मुलांसोबत खूप मस्ती केली. येथे त्यांनी कपाळवर नाणे चिकटवून मुलांना एक गंमत दाखवली, जी मुलांना जादू वाटली. यानंतर पंतप्रधानांनी मुलांनाही हे गोष्ट करायला लावली. पीएम मोदींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप आवडला आहे. वृत्त लिहिपर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले होते.
Modi was seen having fun with children showed the fun by sticking a coin on his forehead+
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये यदुवंशियांबाबत भाजप-आरजेडीमध्ये वादंग!
- म्यानमारमध्ये लष्कराने पुन्हा हवाई हल्ला केला, 5 हजार लोक मिझोरामला पळून आले; 2021च्या सत्तापालटापासून 30 हजार लोकांनी आश्रय घेतला
- बारामतीच्या दिवाळीचे कौतुक पुरे झाले, आता धनगर आरक्षणासाठी उद्या बारामती बंदची हाक
- अमिताभ बच्चन दिवाळखोर झाल्यावर सुब्रत रॉय यांनी दिला होता ‘सहारा’