• Download App
    Samastipur समस्तीपूर मध्ये भर दिवसा मोबाईलची लाईट लावून मोदींनी विझवून टाकला लालूंचा लालटेन!!

    समस्तीपूर मध्ये भर दिवसा मोबाईलची लाईट लावून मोदींनी विझवून टाकला लालूंचा लालटेन!!

    modi

    विशेष प्रतिनिधी

    समस्तीपूर : बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आज पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समस्तीपुर मध्ये भर दिवसा सभेला जमलेल्या लोकांच्या मोबाईलची लाईट लावून लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा लालटेन म्हणजेच कंदील विझवून टाकला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात समस्तीपूर मधून केली. त्याआधी त्यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री करपुरी ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी मोठ्या जन सभेला संबोधित केले. या सभेदरम्यानच मोदींनी अत्यंत नाटकीय पद्धतीने सभेला जमलेल्या लोकांना भर दिवसा मोबाईलची लाईट लावायला सांगितली.



    लोकांनी मोदींच्या आदेशानुसार उभे राहून मोबाईलची लाईट लावली त्याबरोबर मोदींनी प्रश्न विचारला तुमच्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे त्यात लाईट आहे आता तुम्हाला लालटेनची गरज आहे का??, त्याबरोबर लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला. आणि त्यांनी आपल्याला लालटेनची गरज नसल्याचा गजर केला. लालटेन म्हणजेच कंदील लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे चिन्ह आहे. त्यावर शिक्का मारायचा नाही किंवा त्याचे बटन दाबायचे नाही, असे पंतप्रधान मोदींनी सूचकपणे सांगितले.

    या सभेत मोदींनी लालूप्रसाद यादव यांच्या चारा घोटाळ्यापासून ते तेजस्वी यादव यांच्या शिक्षक भरती घोटाळेपर्यंत सगळे घोटाळे बाहेर काढले. लालूप्रसाद यादव आणि सोनिया गांधी यांना आपल्या मुलांचे कल्याण करायचे आहे. बिहारच्या जनतेच्या कल्याणाशी त्यांचा काही संबंध नाही त्यामुळे बिहारच्या युवकांनी यादव आणि गांधींच्या नादी न लागता भाजप आघाडीच्या सरकारला मतदान करावे, असे आवाहन मोदींनी केले. त्यानंतर मोदींनी बेगूसराय मध्ये जाऊन जनसभेला संबोधित केले.

    Modi turned off his mobile phone light in broad daylight in Samastipur

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Sanchar Saathi App : ‘संचार साथी’ने हेरगिरी शक्य नाही आणि होणार नाही, केंद्राने म्हटले- आदेश बदलण्यास तयार

    Rahul Gandhi : राहुल म्हणाले-जाती जनगणना देशातील बहुजनांसोबत उघड विश्वासघात, ना आराखडा, ना संसदेत चर्चा; केंद्राने दिले उत्तर

    Mansukh Mandaviya : नवी कामगार संहिता एप्रिल 2026 पर्यंत लागू होईल; सरकार लवकरच मसुदा नियम पूर्व-प्रकाशित करेल