वृत्तसंस्था
रायपूर : मोदी तेरी कबर खुदेगी ही राजकीय भाषा आहे. त्यात गैर काय आहे?, असा सवाल करत काँग्रेसने ते उदित राज यांनी मोदींच्या काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणेला मोदी तेरी कबर खुदेगी हे उत्तर असल्याचा दावा केला आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर मध्ये काँग्रेसचे महाअधिवेशन सुरू आहे. या महाअधिवेशनादरम्यान काँग्रेसचे अनेक ठराव संमत झाले. ‘Modi teri kabar khudegi’, Udit Raj says, “It’s a political language.When PM speaks of ‘Congress-mukt Bharat’
या अधिवेशन काळात पत्रकारांशी बोलताना उदित राज यांनी मोदी तेरी कबर खुदगी या भाषेचे समर्थन केले. मोदी तेरी कबर खुलेगी ही सभ्य आणि उचित भाषा आहे का? असा सवाल एएनआई या वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने केल्यावर उदित राज म्हणाले, ही राजकीय भाषा आहे. राजकारणात अशाच भाषेत उत्तर दिले जाते. मोदी जेव्हा काँग्रेस मुक्त भारत म्हणतात, तेव्हा काँग्रेसला त्यांना मारून टाकायचे असते का? की त्यांना काँग्रेस राजकीय दृष्ट्या खतम करायचे आहे?, तसेच मोदी तेरी कबर खुदेगी ही भाषा मोदींची राजकीय कबर खुदेगी अशी आहे. म्हणजे मोदींची राजकीय कबर खोदल्याखेरीस भारताचा विकास होणार नाही. भारतात समतेचे सामाजिक न्यायाचे राज्य यायचे असेल तर मोदींची राजकीय कबर खोदणे गरजेचे आहे. नाहीतर या देशात आरएसएसचे असमानतेचे राज्य येईल, असा दावाही उदित राज यांनी केला आहे.
देशाची अर्थव्यवस्था मोदींच्याच राजवटीत पूर्ण घसरली. भारताची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकावर पोचली. पण सर्वसामान्य लोकांची संपत्ती दरडोई उत्पन्न घटले, असा दावा उदित राज यांनी केला.
हेच ते उदित राजा आहेत, जे 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत दिल्लीतून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. परंतु, 2019 च्या निवडणुकीपूर्वी त्यांचे भाजपशी फाटले आणि ते काँग्रेस मधून बाहेर गेले. सध्या ते काँग्रेसचे सदस्य आहेत आणि त्यांनी मोदी तेरी कबर खुदेगी या असभ्य आणि खालच्या स्तराच्या भाषेचे समर्थन केले आहे.
‘Modi teri kabar khudegi’, Udit Raj says, “It’s a political language.When PM speaks of ‘Congress-mukt Bharat’
महत्वाच्या बातम्या
- मोदींना हरविण्यासाठी शरद पवारांपाठोपाठ प्रकाश आंबेडकरांनाही हवी मुसलमानांची साथ!!
- मुंबईतून काँग्रेस गायब; अंतर्गत गटबाजीने पोखरलेला पक्ष विश्रांती मोडवर
- आम आदमी पक्षाची उद्धव ठाकरेंसोबत युतीची तयारी? ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हे उत्तर दिले
- कसब्याची लढाई : जर्जर बापट प्रचारात उतरले म्हणून खुपले; पण उद्धव ठाकरे तर अडीच वर्षांत घरातच बसले!