प्रतिनिधी
नवी दिल्ली : अंदमान निकोबारची राजधानी ब्लेअर मध्ये वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधी यांच्यावर जोरदार प्रहार केले. 2024 च्या निवडणुकीसाठी 26 भ्रष्टाचारी बंगलोरात एकत्र जमले आहेत, पण ऑफ द फॅमिली बाय द फॅमिली फॉर द फॅमिली लोकशाही आहे, अशा तिखट शब्दांमध्ये मोदींनी विरोधी ऐक्यावर हल्लाबोल केला. Modi strikes at Savarkar Airport terminal inauguration
तब्बल 700 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्चुअल कार्यक्रमात केले त्यानंतर केलेल्या भाषणात मोदींनी विरोधी ऐक्याचा समाचार घेतला यावेळी त्यांनी अवधी काव्याचा उल्लेख करून विरोधकांच्या दुकानात भ्रष्टाचाराचा माल आहे पण ते त्याला लेबल वेगळे लावून विकत आहेत, असे शरसंधान साधले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 26 पक्षांच्या विरोधी एकजुटीचा एका फ्रेम मध्ये फोटो पाहिला तर सगळ्या भ्रष्टाचार करणाऱ्या फॅमिली तुम्हाला एकत्र सापडतील. करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून सगळे जामिनावर सुटले आहेत. कुणाला जातीचा अपमान केला म्हणून कोर्टाने शिक्षा दिली आहे. कोण तुरुंगात दहा दहा वर्षे शिक्षा बघून बाहेर आले आहेत. या सगळ्यांना सन्मानाची खुर्ची बंगलोरमध्ये दिली आहे. या सगळ्या फॅमिली पार्टी आहेत. जितका भ्रष्टाचार जास्त तितका त्यांच्यात सन्मान जास्त हेच त्यांचे धोरण आहे. लोकशाहीची सर्वसामान्यांची व्याख्या लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे “ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल” अशी असते. पण 2024 साठी जमलेल्या 26 फॅमिली पार्टीची लोकशाहीची व्याख्या “ऑफ द फॅमिली, बाय द फॅमिली, फॉर द फॅमिली” अशी आहे असे टीकास्त्र मोदींनी सोडले.
विरोधी ऐक्याचा एकच उद्देश आहे, आपली फॅमिली फर्स्ट, नेशन नथिंग!! यासाठी काँग्रेस सारख्या पक्षाने बंगाल मधले आपल्या कारण कार्यकर्त्यांना पूर्ण काँग्रेसच्या हिंसाचाराच्या आगीत लोटले डावे पक्षही आपल्या कार्यकर्त्यांना तेच करत आहेत. आपल्या फॅमिली साठी कार्यकर्त्यांना सोडणाऱ्या पक्षांचे हे नेते आहेत तेच बंगलोरला जमले आहेत.
मात्र एकीकडे या फॅमिली पार्टी एकत्र जमल्या असल्या तरी देशातल्या जनतेने 2024 मध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार आणण्याचा निर्धार केला आहे, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
Modi strikes at Savarkar Airport terminal inauguration
महत्वाच्या बातम्या
- नेहले पे देहला : 26 पक्षांच्या विरोधी ऐक्याला भाजपचे 38 पक्षांच्या सत्ताधारी ऐक्याचे आज प्रत्युत्तर!!
- भाजपमध्ये जाणार का या प्रश्नावर खासदार अमोल कोल्हे यांचे सडेतोड उत्तर..
- “मनधरणी” किंवा “मनसोडणी”, काही झाले तरी शिंदे – फडणवीस सरकारला डग नाही ही खरी पवारांची अडचण!!
- अजितदादांच्या डबल गेम गाठीभेटी; शरदनिष्ठ गोटातच पसरली संशयाची भीती!!