वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री संसदेचे नवीन बांधकाम कसे चालले आहे ते पाहिले पण नेमके तेच हैदराबादचे एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींना टोचले. त्यांनी मोदींवर संसदेच्या कामकाजात कार्यकारी मंडळाने हस्तक्षेप केल्याचा आरोप केला.Modi saw how the new parliament was being built; But Owaisi was stabbed
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल अमेरिका दौऱ्यावरून परत आल्यानंतर रात्री उशिरा नवीन संसद भवनाचे बांधकाम कसे चालले आहे हे पाहण्यासाठी आणि त्याचा आढावा घेण्यासाठी त्या साइटवर गेले होते. त्याचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले. परंतु हीच बाब विरोधकांना टोचली.
यापैकी खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्यातला तथाकथित कायदेशीर मुद्दा उकरून वर काढला आहे. ते म्हणाले, की पंतप्रधान मोदी हे कार्यकारी मंडळाचे प्रमुख आहेत. कायदे मंडळाचे प्रमुख हे लोकसभेचे अध्यक्ष असतात.
कायदेमंडळ – कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांनी एकमेकांमध्ये हस्तक्षेप करायचा नाही, असा संकेत आहे। अशा स्थितीत कार्यकारी मंडळाचे प्रमुख या नात्याने नरेंद्र मोदी यांनी नवीन संसदेच्या बांधकामांचा आढावा घेण्यापेक्षा तो लोकसभेच्या अध्यक्षांनी घेतला असता तर अधिक उचित झाले असते, अशी टीका त्यांनी केली.
वास्तविक पाहता प्रत्यक्ष संसदेच्या कामकाजात पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप केलेला नाही. नवीन संसद तसेच सेंट्रल विस्ट प्रोजेक्टमधल्या अनेक इमारतींचे बांधकाम तिथे सुरू आहे. त्यात अनेक सेक्रेटरिएटचा समावेश आहे. ज्याचा संबंध थेट कार्यकारी मंडळ प्रमुख म्हणून पंतप्रधान मोदींशी येतो.
संपूर्ण सेंट्रल विस्टा प्रोजेक्टची बांधणी आणि त्याची अंमलबजावणी याची जबाबदारी संसदेची नाही तर सरकार म्हणून कार्यकारी मंडळाची आहे. या पार्श्वभूमीवर सेंट्रल विस्टा परिसराची त्याची पाहणी पंतप्रधानांनी केली. यामध्ये संसदेचा किंवा लोकसभा अध्यक्ष यांचा अधिक्षेप कसा काय होतो हे मात्र ओवैसींनी विशद करून सांगितले नाही.
Modi saw how the new parliament was being built; But Owaisi was stabbed
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेतून परतल्यावर पंतप्रधान मोदी थेट पोचले विस्टा प्रोजेक्ट पाहायला; एक तास घेतला आढावा
- “भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा जलसमाधी”; अयोध्येतील धर्मसंसदेत संत परमहंस यांची घोषणा
- महाराष्ट्र व गुजरातला परतीचा पाऊस झोडपणार, आज, उद्या मुसळधार कोसळणार; शास्त्रज्ञाचा इशारा
- SARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी ! यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट