• Download App
    Modi rejects Trump सौ सोनार की, एक लोहार की, ट्रम्पची सगळी लुडबुड मोदींनी एका झटक्यात उधळली!!

    सौ सोनार की, एक लोहार की, ट्रम्पची सगळी लुडबुड मोदींनी एका झटक्यात उधळली!!

    नाशिक : सौ सोनार की, एक लोहार की या कहावतीचा प्रत्यय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅनडा दौऱ्यात आणून दिला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात 13 वेळा लुडबुड करायचा केलेला प्रयत्न पंतप्रधान मोदींनी एका झटक्यात उधळून लावला. डोनाल्ड ट्रम्प यांचा त्या पलीकडचा देखील एक महत्त्वाचा diplomatic lunch चा‌ “डाव” मोदींनी मोडून टाकला. Modi rejects Trump

    G7 च्या बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट अपेक्षित होती. पण मोदी कॅनडात पोहोचण्यापूर्वीच ट्रम्प कॅनडा सोडून अमेरिकेत निघून गेले. त्यामुळे दोघांची भेट टळली. पण G7 ची बैठक संपल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन केला. दोघांमध्ये 35 मिनिटे चर्चा झाली. यावेळी ट्रम्प यांनी मोदींना कॅनडा दौरा संपल्यावर लगेच अमेरिकेत यायचे निमंत्रण दिले. पण मोदींनी क्रोएशिया दौऱ्याच्या नियोजनाचे कारण सांगून ट्रम्प यांचे निमंत्रण नाकारले. पण ट्रम्प यांना भारतात होणार असलेल्या QUAD राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीचे निमंत्रण दिले. ते ट्रम्प यांनी आनंदाने स्वीकारले. मोदी कॅनडातून थेट क्रोएशिया मध्ये दाखल झाले.



    फोनवर मोदींनी ट्रम्प यांना स्पष्ट शब्दांत सुनावले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षात कधीच भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार विषयक चर्चा झाली नाही. शस्त्रसंधीसाठी भारताने अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली नाही. ती कधी स्वीकारणार नाही. Operation sindoor चा पहिला टप्पा यशस्वी झाला. पाकिस्तानने विनंती केली म्हणून भारताने सैनिकी पातळीवर चर्चा करून सैनिकी कारवाई थांबवली.

     diplomatic lunch चा डाव उधळून लावला

    त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्रसंधीचे क्रेडिट 13 वेळा घेऊन देखील काही फायदा झाला नाही. मोदींनी ते “क्रेडिट” एका झटक्यात काढून घेतले. पण त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानी स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये जेवले. या diplomatic lunch मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना परस्पर सहभागी करवून घ्यायचा ट्रम्प यांचा “डाव” होता.‌ आपण एकाच वेळी पाकिस्तानच्या फिल्ड मार्शल बरोबर आणि भारताच्या पंतप्रधानाबरोबर जेवतो असे ट्रम्प यांना सगळ्या जगाला दाखवून द्यायचे होते. म्हणूनच त्यांनी मोदींना कॅनडा दौरा संपल्याबरोबर अमेरिकेत यायचे निमंत्रण दिले होते. पण मोदींनी यातला “डाव” बरोबर ओळखून ट्रम्प यांचे निमंत्रण नाकारले आणि ते क्रोएशियाला निघून गेले.

    Modi rejects Trump mediation once and for all

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Tahawwur Rana, : दहशतवादी तहव्वूरची न्यायालयीन कोठडी 13 ऑगस्टपर्यंत वाढली; NIAने पुरवणी आरोपपत्र दाखल केले

    Delhi High Court : दिल्ली हायकोर्टाने म्हटले- संसदेला सूचना देऊ शकत नाही, कायदे बनवणे-बदलणे त्यांचे काम; BNSची कलमे हटवण्याची याचिका फेटाळली

    राहुल गांधी आणि सगळ्या विरोधकांचे आर्ग्युमेंट कोसळले; बिहार मतदार यादीचे पुनरीक्षण स्थगित करायला सुप्रीम कोर्टाचा नकार!!