वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीचे राजकीय मशागत सुरू झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी परस्पर विरोधी आघाडी संभाळायला सुरुवात केल्याचे आज दिसून आले. Modi-Rahul struggle to attract Dalit voters in Uttar Pradesh
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महात्मा गौतम बुद्धांच्या कुशीनगरात होते, तर काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आज दिल्लीत आवर्जून वाल्मिकी जयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुशी नगरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी कुशीनगर मधल्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन देखील केले.
यावेळी त्यांच्या समवेत श्रीलंकेतून गौतम बुद्धांच्या स्मरण वस्तू घेऊन आलेले श्रीलंकेचे मंत्री नमल राजपक्षे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात डबल इंजिन सरकारच्या विकासकामांचा पाढा वाचला. उत्तर प्रदेश गुंड आणि माफिया मुक्त करण्याचे श्रेय त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिले. त्याच बरोबर गौतम बुद्ध सर्किट संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणाही केल्या. भारतात आणि श्रीलंकेत जिथे जिथे गौतम बुद्धांची स्थाने आहेत ती सर्व स्थाने महामार्ग, रेल्वे मार्गांनी आणि हवाई मार्गांनी जोडण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला.
दुसरीकडे राहुल गांधी यांनी केंद्रातल्या मोदी आणि उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला दलित अत्याचारांबद्दल धारेवर धरले. देशाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर दलितांवर हल्ले कधीही झाले नाहीत, असा दावा त्यांनी केला. महर्षी वाल्मिकींनी समतेचा संदेश दिला. तो भारताच्या राज्यघटनेने स्वीकारला. काँग्रेस पक्ष त्याच समतेचा – संदेशाचा प्रचार-प्रसार करतो आहे, असे ते म्हणाले.
केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकार समाजाला तोडण्याचा प्रयत्न करतात. पण ते जेवढा तोडण्याचा प्रयत्न करतील तेवढा काँग्रेस पक्ष सर्व समाज जोडून घेण्याचा प्रयत्न करेल, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांचेही कार्यक्रम उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक केंद्रित आणि त्यातही दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट होते. त्यातून दोन्ही नेत्यांनी आपापले पक्ष मजबुतीने दलितांना समोर ठेवण्याचा आज प्रयत्न केला. ही आजची सुरुवात आहे. येत्या पाच महिन्यात दोन्ही नेत्यांबरोबरच दोन्ही पक्षांमध्येही मोठे राजकीय घमासान बघायला मिळणार आहे. त्याची आज कुशीनगर आणि वाल्मिकी जयंतीच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने झलक पाहायला मिळाली.
Modi-Rahul struggle to attract Dalit voters in Uttar Pradesh
महत्त्वाच्या बातम्या
- पीएम मोदींचे सीव्हीसी- सीबीआयच्या संयुक्त परिषदेला संबोधन, म्हणाले, देशाला लुटणारे कितीही शक्तिशाली असले तरी आमचे सरकार त्यांना सोडत नाही!
- तामिळनाडू सरकार मंदिरांमधील 2000 किलो सोने वितळवण्याच्या तयारीत, हिंदू संघटनांचा विरोध, उच्च न्यायालयात स्थगितीसाठी याचिका
- Punjab Congress : मुख्यमंत्री चन्नी यांचे नवजोत सिद्धू यांना आव्हान, मुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी, म्हणाले – दोन महिने मुख्यमंत्री होऊन काम करून दाखवा!
- शिवसेना खा. भावना गवळी आजही ईडीपुढे हजर होणार नाहीत, चिकुनगुनियाचे कारण देत 15 दिवसांची मागितली मुदत
- Aryan Khan Drugs Case : एनसीबीच्या हाती ड्रग्जशी संबंधित आर्यनच्या चॅट्स, पार्टीच्या आधीही एका बड्या अभिनेत्रीशी चॅटिंग