ग्लोबल साउथच्या देशांमध्ये एकता आणि सहकार्याची गरज व्यक्त केली
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात झालेल्या नागरिकांच्या हत्येचा निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धामुळे पश्चिम आशियातील वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ग्लोबल साउथच्या देशांमध्ये एकता आणि सहकार्याची गरज व्यक्त केली. Modi protested over civilian deaths in Israel-Hamas war
दुसऱ्या व्हॉईस ऑफ द ग्लोबल साउथ समिटच्या उद्घाटन सत्रात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंसा आणि दहशतवादाविरुद्ध भारताच्या अटळ भूमिकेवर जोर दिला. दहशतवादाच्या घटनांमध्ये ऑक्टोबरमध्ये हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचाही समावेश होता. युद्ध संपवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संयम राखण्याचे आणि संवादाला प्राधान्य देण्याचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
पंतप्रधान म्हणाले, “आपल्या सर्वांसाठी हे स्पष्ट आहे की पश्चिम आशिया प्रदेशात घडणाऱ्या घटनांमुळे नवीन आव्हाने उभी राहत आहेत… भारताने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे… आम्हीही संयम बाळगला. … आम्ही संवाद आणि मुत्सद्देगिरीवर भर दिला आहे… इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात नागरिकांच्या मृत्यूचा आम्ही तीव्र निषेध करतो…”