• Download App
    Modi - Pawar : आमरस नाहीच पचला!!; राजू शेट्टी आघाडीतून काल बाहेर पडले; 12 आमदारांसाठी पवार आज मोदींना भेटले!!|Modi - Pawar: Amaras not digested !!; Raju Shetty dropped out of the lead yesterday; Pawar meets Modi today for 12 MLAs

    Modi – Pawar : आमरस नाहीच पचला!!; राजू शेट्टी आघाडीतून काल बाहेर पडले; 12 आमदारांसाठी पवार आज मोदींना भेटले!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बारामतीच्या गोविंद बागेतला आमरस राजू शेट्टींना नाहीच पचला… राजू शेट्टी काल महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि नेमका दुसऱ्या दिवशीचा “राजकीय मुहूर्त” गाठत शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी भेटले.Modi – Pawar: Amaras not digested !!; Raju Shetty dropped out of the lead yesterday; Pawar meets Modi today for 12 MLAs

    राजू शेट्टी यांनी आपल्याला राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेची आमदारकी मिळावी यासाठी गेली अडीच वर्ष जंगजंग पछाडले. पवारांच्या गोविंद बागेतल्या घरी जाऊन आमरस पुरी खाल्ली. तो आमरस शेवटपर्यंत राजू शेट्टींना पचला नाही. राजू शेट्टी यांचे एकही काम महाविकास आघाडीने केले नाही आणि ते बाहेर पडल्याबरोबर लगेच शरद पवार यांनी “राजकीय मुहूर्त” गाठत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा विषय त्यांच्या पुढे मांडला.



    विधान परिषदेतील 12 आमदारांची नियुक्ती केवळ राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या विशिष्ट भूमिकेमुळे गेली अडीच वर्षे रखडली आहे. या नियुक्तीचा मार्ग मोकळा करावा, अशी विनंती आपण पंतप्रधानांना केल्याचे शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

    मात्र राजू शेट्टी हे कालच महाविकास आघाडीतून बाहेर पडले यावर आपली काय भूमिका आहे?, असा प्रश्‍न विचारल्यानंतर राजू शेट्टी यांनी नेहमी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यात काही बदल नाही, असे उत्तर पवारांनी गेले.

    परंतु राजू शेट्टी यांचे नाव विधानपरिषदेच्या 12 नियुक्त आमदारांमध्ये होते. याबाबत कोणत्याही पत्रकाराने प्रश्न त्यांना विचारला नाही. त्यामुळे पवार यांनी या “नेमक्या” प्रश्नाचे उत्तरही दिले नाही. पण राजू शेट्टी काल महाविकास आघाडीतून अधिकृतरीत्या बाहेर पडले आणि आजच राजकीय मुहूर्त गाठत शरद पवार हे पंतप्रधानांना 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी भेटले हा राजकीय योगायोग दक्षिण महाराष्ट्रासाठी तरी काही साधा नाही…!!

    Modi – Pawar: Amaras not digested !!; Raju Shetty dropped out of the lead yesterday; Pawar meets Modi today for 12 MLAs

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य