प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या 20 मिनिटांची भेट दिली काय आणि मराठी माध्यमांनी लगेच पवारांच्या “राष्ट्रीय नेतृत्वाच्या” विश्लेषणाच्या उकळ्या आणायला सुरुवात केली. अनेक माध्यमांनी मोदी – पवार भेटीच्या राष्ट्रपति निवडणुकीशी देखील संबंध जोडला त्याच वेळी पवार केंद्रीय तपास संस्थांच्या अखेर एका विरोधात मोदींना भेटल्याचे विश्लेषणाची शेपूट जोडले. प्रत्यक्षात या भेटीमध्ये नेमके काय झाले या दोन्ही नेत्यांनी अद्याप अजिबात कुठेही शेअर केलेले नाही मराठी माध्यमांमध्ये ज्या बातम्या सुरू आहेत त्या फक्त जर-तर याच अर्थाने सुरू आहेत. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीची फोडणी देखील दिली आहे. Modi – Pawar: After Modi-Pawar meeting, Marathi media started analyzing
केंद्रीय तपास यंत्रणांनी राष्ट्रवादीचे मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मालिक यांना आत मध्ये घातले असताना दुसरीकडे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे तर मोठी खलबते सुरू असल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार आणि पंतप्रधान मोदी या दोन्ही नेत्यांमध्ये दिल्लीत संसदेतील पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. या दोघांत साधारण २० मिनिटे चर्चा झाली.
पवार- मोदींच्या भेटीवर अनेक तर्क-वितर्क
या दोन्ही नेत्यांमध्ये याआधी गेल्या वर्षी १७ जुलै रोजी भेट झाली होती. त्यावेळी देखील विविध मुद्यांवर चर्चा झाली होती. मात्र बुधवारी झालेल्या या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याचा तपशील समजू शकला नाही. पवारांनी अचानक मोदींची भेट घेतल्याने या भेटीवर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. देशाच्या राजकारणातील मोठे नेते असणाऱ्या शरद पवार आणि मोदींमध्ये भेट झाल्यानंतर त्याची नेहमीच चर्चा होत असते. मात्र यावेळी शरद पवारांनी घेतलेली भेट आणि महाराष्ट्रातील घडामोडी यामुळे याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आघाडी सरकारच्या नेत्यांवर तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर मोदी आणि पवारांची भेट अत्यंत मानली जात आहे. मात्र, या धाडसत्रावर दोन्ही नेत्यांच्या भेटीत चर्चा झाली की नाही याबाबतची माहिती मिळू शकली नाही.
मोदींच्या भेटीनंतर पवारांची पत्रकार परिषद
महाराष्ट्रातील खासदार आणि आमदार मंगळवारी दिल्लीत आले होते. अभ्यास वर्गासाठी हे आमदार दिल्लीत आले होते. महाराष्ट्रातील या आमदार, खासदारांसाठी सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे चहापानाचा कार्यक्रम होता. तर मंगळवारी रात्री शरद पवार यांच्या निवासस्थानी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याशिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील हजेरी लावली होती.
यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेत शरद पवार यांनी राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचे म्हटले होते. राज्य सरकार कोणत्याही परिस्थिती कोसळणार नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. या पार्श्वभूमीवर बुधवारी 4.00 वाजता पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर शरद पवार पत्रकार परिषद घेणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आज शरद पवार काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Modi – Pawar: After Modi-Pawar meeting, Marathi media started analyzing
महत्त्वाच्या बातम्या
- पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशामध्ये भविष्यात अराजक; स्वामी यांचा केंद्राला इशारा
- Anil Deshmukh CBI : सीबीआयने घेतला अनिल देशमुखांचा ताबा!!
- BJP Growth : 42 वर्षे – 900% मतदार – खासदार 15000% वाढ!!; चिनी कम्युनिस्ट पक्षावरही मात!!
- Raut – Somaiya : विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लाटली 58 कोटींची रक्कम; राऊतांचा सोमय्यांवर देशद्रोहाचा आरोप!!
- प्रियंका चोप्राने लॉस एंजेलिसमधील मॅनहोलच्या ; ‘मेड इन इंडिया कव्हर’चा फोटो केला शेअर
- नागालँडच्या पहिल्या महिला राज्यसभा खासदाराने पारंपारिक पोशाख, दागिन्यांमध्ये घेतली शपथ