विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑनलाईन अभ्यास करताना अधिक कॉन्सन्ट्रेशन करून अभ्यासाकडे लक्ष द्या. टप्प्याटप्प्याने अभ्यास करा. ऑनलाईन अभ्यासाच्या वेळी सोशल मीडियातील रिल्स पाण्यात तसेच चॅट करण्यात वेळ घालवू नका, असा मोलाचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. वर्षभराच्या गॅपनंतर पंतप्रधान मोदी यांनी आज विद्यार्थ्यांशी “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमातून थेट संवाद साधला. Modi Pariksha Pe Charcha: Don’t spend time watching reels on social media in online study; PM Modi’s advice !!
यावेळी तालकटोरा स्टेडियममध्ये 1000 विद्यार्थी उपस्थित होते. पण देशभरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खास स्क्रिनची सोय करून कोट्यावधी विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांच्या झालेल्या संवादात सहभाग घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा कार्यक्रम मला खूप प्रिय आहे, परंतु कोरोनाच्या काळात तुम्हाला त्यापैकी बहुतेकांना भेटता आले नाही. हा माझ्यासाठी आनंददायी कार्यक्रम आहे. खूप दिवसांनी तुम्हा सर्वांना भेटलो. मला वाटत नाही की, तुम्ही परीक्षेला घाबराल. पण तुमच्या पालकांना परीक्षेची भीती वाटते. अनेक पालकांना मुलांपेक्षा जास्त टेन्शन आहे.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, परीक्षा ही जीवनाची साधी गोष्ट आहे. परीक्षा म्हणजे सर्वस्व नाही. ते आपल्या विकास यात्रेचे हे लहान टप्पे आहेत. या टप्प्यातून आम्हीही गेलो आहोत. यापूर्वीही आम्ही अनेकदा परीक्षा दिली आहे. जेव्हा हा विश्वास निर्माण होतो. पुढच्या काळात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी हा अनुभव ताकद म्हणून कामी येतो.
ऑनलाइन अभ्यास करण्याचे आव्हान!
करुणा काळात निर्माण झालेल्या ऑनलाइन शिक्षण व्यवस्थेबाबत पंतप्रधानांनी भाष्य केले ऑनलाईन अभ्यास करताना एकाग्रता निर्माण होते का निर्माण होत नसल्यास सोशल मीडिया आता आपला वेळ वाया चालला आहे का आपण फक्त रिल्स पाहतो आहोत का?, याचा विद्यार्थ्यांनी विचार करावा.
हा मुद्दा फक्त ऑनलाईन किंवा ऑफलाईन असा नाही, तर एकाग्रतेचा आहे. दिवसभरात स्वतःसाठी थोडा वेळ काढा, जेव्हा तुम्ही ऑनलाइन/ऑफलाइन ऐवजी “इनरलाइन” म्हणजे स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा, असा सल्लाही पंतप्रधान मोदी यांनी दिला.
कार्यक्रमासाठी विशेष व्यवस्था
यावेळी भारताचे सर्व राज्यपाल राजभवनात विद्यार्थी आणि शिक्षक ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले आहेत. केंद्रीय उच्च शैक्षणिक संस्थांमध्येही हा कार्यक्रम आयोजित केला जाईल.
2018 मध्ये कार्यक्रमाला सुरुवात
“परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमाला 2018 साली सुरुवात झाली. बोर्डाच्या परीक्षेआधी पंतप्रधान विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांना तणावमुक्त करण्याबाबत चर्चा करतात. कोरोनामुळे गेली दोन वर्ष हा कार्यक्रम ऑनलाईन झाला होता.
Modi Pariksha Pe Charcha: Don’t spend time watching reels on social media in online study; PM Modi’s advice !!
महत्त्वाच्या बातम्या
- यंदाचा हा मार्च महिना देशाच्या इतिहासात दुसरा सर्वात तप्त महिना ठरला
- व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, २५० रुपयांनी वाढ, घरगुतीचे दर जैसे थे; सामान्य ग्राहकांना दिलासा
- महागाई विराेधात भाष्य न करता भाजपचे नेते लपून बसले – बाळासाहेब थाेरात
- ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे रविवारी पुण्यात उदघाटन