• Download App
    मोदींनी गुजरातला दिली मोठी भेट, सुरत डायमंड बोर्स आणि विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन|Modi paid a grand gift to gujarat inaugurating the Surat Diamond Bourse and the airport's new terminal building

    मोदींनी गुजरातला दिली मोठी भेट, सुरत डायमंड बोर्स आणि विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन

    सूरत डायमंड बोर्सची इमारत 67 लाख वर्गफुट पेक्षा अधिक परिसरात पसरलेली आहे


    विशेष प्रतिनिधी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला दोन मोठ्या भेट दिल्या आहेत. मोदींनी रविवारी सुरत विमानतळ आणि सुरत डायमंड बोर्सच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन करण्यापूर्वी मोदींनी रोड शो केला. यावेळी मोठ्या संख्येने लोक त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभा असल्याचे दिसून आले.Modi paid a grand gift to gujarat inaugurating the Surat Diamond Bourse and the airport’s new terminal building



    सुरत डायमंड बोर्स हे आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यापारासाठी जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र असेल. नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत एकाचवेळी 1200 देशांतर्गत प्रवासी आणि 600 आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हाताळण्यास सक्षम आहे आणि या कालावधीत तिची क्षमता 3,000 प्रवाशांपर्यंत वाढवण्याची तरतूद आहे.

    त्यामुळे या विमानतळाची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता आता 55 लाख प्रवाशांपर्यंत पोहोचली आहे. टर्मिनल इमारत स्थानिक संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन बांधण्यात आली आहे.

    सूरत डायमंड बोर्सची इमारत 67 लाख वर्गफुट पेक्षा अधिक परिसरात पसरलेली आहे. जो जगभारतील सर्वात मोठा कार्यालय परिसर आहे. ही सूरत शहराजवळील खजोद गावत आहे. हे कच्चे आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांसोबतच दागिण्यांच्या व्यापाराचे एक जागतिक केंद्र असेल.

    Modi paid a grand gift to gujarat inaugurating the Surat Diamond Bourse and the airport’s new terminal building

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले

    India Census 2027 : जनगणना 2027- पहिला टप्पा 1 एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान होईल, सरकार घरांची यादी आणि माहिती गोळा करेल