• Download App
    आधी "ते" मोदींच्या विरोधात;... म्हणूनच पडलेत गडकरींच्या प्रेमात!!Modi opponents gathered together to support nitin gadkari

    आधी “ते” मोदींच्या विरोधात;… म्हणूनच पडलेत गडकरींच्या प्रेमात!!

    विनायक ढेरे

    आधी ते मोदींच्या विरोधात;… म्हणूनच पडलेत गडकरींच्या प्रेमात!!, असेच म्हणायची वेळ आता आली आहे… कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपच्या संसदीय मंडळातून वगळल्यानंतर मूळातल्या मोदी विरोधकांचे गडकरी प्रेम अधिक उफाळून आले आहे. लोकशाही धोक्यात आली या पासून ते मुलींना स्वतःच्या पंतप्रधान पदाचे संभाव्य विरोधक देखील नकोसे झाले आहेत, इथपर्यंत आरोपांच्या फैरी मोदीविरोधकांनी झाडल्या आहेत. त्याला गडकरी प्रेमाची झालर लावली आहे. Modi opponents gathered together to support nitin gadkari

    राष्ट्रवादी काँग्रेसचे गडकरी प्रेम

    गडकरींच्या संसदीय मंडळातून वगळण्याची बातमी आल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले गडकरी प्रेम उघड करत भाजपवर शरसंधान साधले होते. आधीच भाजपमध्ये लोकशाही नाही. त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एवढे वर्चस्व आहे, की त्यांना आव्हान देणाऱ्या नितीन गडकरींना संसदीय मंडळातून देखील वगळले आहे. हा लोकशाहीसाठी धोका असल्याचे ट्विट राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्रेडल क्रॅस्टो यांनी केले होते.



    काँग्रेसचा मोदी विरोध, गडकरी प्रेम!!

    काँग्रेसने देखील गडकरींच्या मुद्द्यावरून लोकशाही धोक्यात आल्याचा गळा काढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या पदासाठी संभाव्य स्पर्धक नकोसा झाल्यानेच गडकरींना संसदीय मंडळातून देखील मोदींनी दूर केले. भाजपमध्ये आधीच लोकशाही नाही. त्यात आता सगळे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच घेतात असे शरसंधान काँग्रेसने साधले आहे.

    सुब्रमण्यम स्वामी यांची भर

    यामध्ये आता भाजपचेच पण मोदी विरोधातले प्रख्यात खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांची देखील भर पडली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटमध्ये देखील वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांपेक्षा फारसा वेगळा मुद्दा नाही. फक्त पूर्वी भाजप संसदीय मंडळ आणि अन्य पदांवर निवडणुका होऊन नियुक्त्या होत असत. आता मात्र एकही नियुक्ती निवडणूक होऊन झालेली नाही. मोदी करतील ती पूर्व दिशा असल्याने त्यांच्या संमतीने सगळ्या नियुक्त्या होत असल्याचे ट्विट डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

    गडकरींचे राजकीय यशापयश

    या सर्व टीकेमध्ये “मोदीविरोध” कॉमन फॅक्टर आहे “गडकरी प्रेम” हे त्या विरोधाची झालर आहे!! गडकरींच्या वैयक्तिक प्रेमापोटी कोणीही ट्विट केलेले नाही. जे काही गडकरी प्रेम उफाळले आहे त्यापेक्षा मोदी विरोध अधिक ठळक आहे. संसदीय मंडळातून गडकरींना वगळले ही राजकीय वस्तुस्थिती आहे. त्यामध्ये आता मोदी आणि अमित शहा यांची या दोन गुजराती नेत्यांचे वर्चस्व असणार हे उघड आहे. पण प्रश्न त्या पलिकडचा आहे. गडकरींना या दोन गुजराती नेत्यांवर मात का करता आली नाही??, हा आहे. राजकारणात कुणी कुणाचे नसतो हे गडकरींना किंवा त्यांच्या समर्थकांना उमगले नाही का??, उमगले असेल त्यांना गुजराती लॉबी विरोधात परिणामकारक रित्या राजकीय लढता आली नाही का?? त्यांनी राजकीय लढाईचा प्रयत्न केला पण ती यशस्वी झाली नाही का??, हे मूलभूत प्रश्न आहेत.

    गडकरींच्या नेतृत्वाखाली लोकसभेत अपयश

    गडकरी हे अमित शहा यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. अमित शहा हे भाजपचे अध्यक्ष होण्याआधी गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या कारकीर्दीत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला 113 जागा मिळाल्या होत्या. हा मुद्दा गडकरींच्या राजकीय यशापयशाचे मूल्यमापन करताना महत्त्वाचा नाही का??, हा कळीचा सवाल आहे. आज जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि सुब्रमण्यम स्वामी यांचे मोदीविरोधातून गडकरी प्रेम उफाळून आले आहे, तेव्हा गडकरींच्या नेतृत्वाखाली भाजपला लोकसभेत 113 जागा मिळाल्या होत्या या वस्तुस्थितीकडे ते दुर्लक्ष करत नाहीत का??, हाच खरा सवाल आहे!! आणि तिथेच गडकरींना संसदीय मंडळापासून मंडळातून दूर करण्याचे खरे राजकीय इंगित दडले आहे.

    Modi opponents gathered together to support nitin gadkari

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी