• Download App
    संत रविदास जयंती निमित्त मोदी - योगींकडून दर्शन आणि शबद कीर्तन, लंगर मध्ये सहभाग!! । Modi on the occasion of Sant Ravidas Jayanti - Darshan and Shabad Kirtan from Yogi, participation in langar !!

    संत रविदास जयंती निमित्त मोदी – योगींकडून दर्शन आणि शबद कीर्तन, लंगर मध्ये सहभाग!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली /वाराणसी : माग पौर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संत रविदास यांच्या दर्शनाने आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात केली. संत रविदास जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवी दिल्ली आणि वाराणसी मध्ये संत रविदास यांच्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले. Modi on the occasion of Sant Ravidas Jayanti – Darshan and Shabad Kirtan from Yogi, participation in langar !!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळीच नवी दिल्लीतील करोलबाग मध्ये संत रविदास मंदिरात पोहोचले. त्यांनी तेथे संत रविदास यांचे दर्शन घेतले आणि मंदिरात महिलांसमवेत शबद कीर्तनामध्ये सहभाग घेतला. त्याचा व्हिडिओ पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून शेअर केला आहे.

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाराणसी मध्ये संत रविदास मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि लंगर मध्ये प्रसाद ग्रहण केले. माघ पौर्णिमेनिमित्त पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांनी आपल्या दिवसाची सुरुवात संत रविदास यांच्या दर्शनाने केली. उत्तर प्रदेश, पंजाब मध्ये विधानसभा निवडणूक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी संत रविदास दर्शनाच्या निमित्ताने दलित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    Modi on the occasion of Sant Ravidas Jayanti – Darshan and Shabad Kirtan from Yogi, participation in langar !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Kisan : किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता या आठवड्यात येण्याची शक्यता; PM मोदी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात करणार ट्रान्सफर

    Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन: बिहार मतदार यादीवरून विरोधक आक्रमक; सरकारकडून 7 महत्त्वाची विधेयके सादर होणार

    Kolhapuri Chappals : कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्यांना प्राडा कंपनीकडून आश्वासन – आता जागतिक बाजारपेठेत संधी!