विशेष म्हणजे दिग्विजय सिंह या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, जाणून घ्या या प्रकारानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती?
विशेष प्रतिनिधी
इंदुर : मध्य प्रदेशातील इंदुरमधून एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो सध्या प्रचंड व्हायरल होत आणि ज्याची सर्वत्र जोरदार चर्चाही पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेत्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सपत्निक हजेरी लावलेल्या दिग्विजय सिंह यांच्यासमोर नागरिकांनी मोदी-मोदी अशी जोरदार घोषणाबाजी केली. Modi Modi slogans of citizens in front of Digvijay Singh at Congress leaders event in Indore
हा व्हिड़ीओ इंदुरमधील रामनवमीच्या कार्यक्रमातील आहे. येथील अभय प्रशालमध्ये हंसराज रघुवंशी यांच्या भजनसंध्येचे आयोजन काँग्रेसचे माजी आमदार सत्यनारायण पटेल यांच्यावतीने करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे सपत्निक उपस्थि होते. मात्र दिग्विजय सिंह मंचावर येताच, उपस्थित नागरिकांनी जोरदार मोदी-मोदीच्या घोषणा देणे सुरू केले.
भाजपा प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनीही हा व्हिडीओ त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, ‘’अद्भूत घटना, कार्यक्रम – राम नवमी, आयोजक – काँग्रेसचे माजी आमदार सत्यनारायण पटेल, पाहुणे – दिग्विजय सिंह, स्थळ – क्रीडा प्रशाल, इंदूर आणि उपस्थित तरुण, जनतेने मोदी-मोदी-मोदी… अशा घोषणा दिल्या. येणार तर मोदीच…. अशावेळी काँग्रेस नेत्यांची अवस्था समजू शकते.’’
अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले दिग्विज सिंह हे काहीही न बोलता मंचावरून उतरले आणि पत्नीसह खाली जाऊन बसले. यामुळे काँग्रेस नेत्यांची प्रचंड अवघडल्यासारखी स्थिती झाली होती. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, विविध प्रतिक्रियाही समोर येत आहेत.
Modi Modi slogans of citizens in front of Digvijay Singh at Congress leaders event in Indore
महत्वाच्या बातम्या
- आज PM मोदी एकाच वेळी करणार दोन वंदे भारताचे लोकार्पण, या राज्यांतील प्रवाशांना मिळणार लाभ
- अदानींच्या समर्थनाचे पवारांचे वक्तव्य, काँग्रेस हायकमांडला टोचून महाराष्ट्रातल्याच महाविकास आघाडीला सुरुंग!!
- सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर ढकलेले काँग्रेस नेतृत्व अदानी मुद्द्यावर पवारांच्या मुलाखतीच्या डावपेची राजकारणापुढे झुकेल??
- नऊ वर्षांत तब्बल २३ दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी; प्रत्येकाचं कारण मात्र एकच ते म्हणजे…