उपराष्ट्रपती धनकड यांनी संसदेसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे Modi is the first Prime Minister after Nehru to win power for the third time in a row
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी शुक्रवारी सांगितले की, गेल्या सहा दशकांत असे पहिल्यांदाच झाले की, एखादे पंतप्रधान सलग तिसऱ्यांदा सत्तेत आले आहेत. 1962 नंतर पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानास तिसऱ्यांदा सरकार स्थापनेची संधी मिळाली आहे.
राज्यसभेच्या प्रशिक्षण कार्यक्रमातील सहभागींना संबोधित करताना, धनकड यांनी प्रशिक्षणार्थींना त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी आणि लोकशाहीतील हानिकारक प्रवृत्तींविरूद्ध जागरुक राहण्यासाठी सोशल मीडियाच्या सामर्थ्याचा वापर करण्याचे आवाहन केले. सकारात्मक विकासासाठी संसदेत विधायक चर्चा, संवाद आणि चर्चेच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला.
भारताचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हॅट्ट्रिक शपथविधीचा मुहूर्त ठरला असून राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात 9 जून 2024 रोजी सायंकाळी 7:15 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला शपथ देतील. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी होणार आहे. शपथविधी समारंभाच्या तयारीच्या निमित्ताने 8 जून, 15 जून आणि 22 जून या तीन दिवसांमध्ये राष्ट्रपती भवनातला चेंज ऑफ गार्डचा कार्यक्रम होणार नाही. राष्ट्रपती भवनातून अधिकृतरित्या ही माहिती जारी करण्यात आली.
Modi is the first Prime Minister after Nehru to win power for the third time in a row
महत्वाच्या बातम्या
- नितीश कुमार यांचा निर्धार, मी कायम मोदींसोबत असेन, भाषणानंतर पंतप्रधानांचे चरण स्पर्श करू लागले तेव्हा मोदींनी हात धरला
- पुण्यात आजपासून “सक्षम” संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन; शोभायात्रा आणि प्रदर्शन घेतील लक्ष वेधून!!
- फरिदाबादमध्ये रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले, बचावकार्य सुरू
- मोदींच्या हॅटट्रिक शपथविधीचा मुहूर्त ठरला; स्थळ : राष्ट्रपती भवन, 9 जून 2024 सायंकाळी 7:15!!