• Download App
    बिगर भाजप शासित राज्यांमध्येही मोदीच नंबर 1; Modi is No. 1 even in non-BJP ruled states

    बिगर भाजप शासित राज्यांमध्येही मोदीच नंबर 1; प्रत्यक्ष बंगालमध्येही ममता पिछाडीवर; राहुल, केजरीवाल तर फारच दूर!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील ज्या राज्यांमध्ये भाजप सध्या सत्तेवर नाही, संघटनाही कमकुवत आहे, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे अशा राज्यात बिगर भाजपशासित राज्यांमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच नंबर 1 वर आहेत. Modi is No. 1 even in non-BJP ruled states

    इतकेच काय पण ज्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी इर्षेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव केला, त्या बंगालमध्येही पंतप्रधानपदासाठीच्या मतचाचणीत नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जींना पिछाडीवर टाकले आहे. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल तर फारच दूर आहेत!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला आता 8 वर्ष पूर्ण होत आहेत. सी व्होटरद्वारे करण्यात आलेल्या IANS-C Voter Survey तली ही आकडेवारी आहे. यामध्ये राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांना जनतेने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मोदींपेक्षा फारच कमी मते दिली आहेत.



    मोदींना सर्वाधिक पसंती

    2021 साली देशात अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. या राज्यामध्ये सी व्होटरद्वारे एक सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये तामिळनाडू आणि केरळ ही राज्ये वगळता इतर सर्व ठिकाणी जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून पसंती दिली आहे. तर केरळ आणि तामिळनाडूमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना जनतेने मोदींपेक्षा जास्त पाठिंबा दिला आहे.

    पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून तुम्हाला कोणता नेता योग्य वाटतो?, असा प्रश्न या सर्व्हेमध्ये विचारला होता. यावेळी आसाममधील 43 %, केरळमधील 28 % जनतेने मोदींना पंतप्रधान म्हणून प्राधान्य दिले आहे. तर तामिळनाडून 29.56 %, केरळमध्ये 49.69 % लोकांनी मोदींच्या पारड्यात मत टाकले आहे. पश्चिम बंगालमध्ये 42.37 % लोकांनी मोदींना आपला पाठिंबा दिला आहे.

    गांधी, केजरीवाल आणि बॅनर्जींना अल्प प्रतिसाद

    त्यामुळे या पाच राज्यांची आणि पुदुच्चेरीतील मतांची आकडेवारी एकत्र केल्यास मोदींना 49.91% लोकांनी आपली पसंती दिली, तर या यादीत राहुल गांधी 10.1 % टक्के, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 7.62 % जनतेने पंतप्रधान पदाचे योग्य उमेदवार म्हणून मत दिले आहे. काँग्रेसच्या इतर नेत्यांना 5.46 % तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 3.23 % लोकांनी आपली पसंती दर्शवली आहे.

    Modi is No. 1 even in non-BJP ruled states

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य