वृत्तसंस्था
हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण शनिवारी बसंत पंचमीच्या मुहूर्तावर होणार आहे. हैदराबाद येथे पंतप्रधान वैष्णव संत रामानुजाचार्य स्वामी यांचा समतेचा पुतळा राष्ट्राला समर्पित करतील. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी या नावाने ओळखल्या जाणारी अष्टधातुपासून बनलेली जगातील सर्वात मोठी मूर्ती आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचा समावेश केला आहे. Modi inaugurates Statue of Equality today; The largest idol of Saint Ramanujacharya in the world
सुमारे १००० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या रामानुजाचार्य मंदिरात ही मूर्ती बसवली आहे. तत्पूर्वी, पीएम मोदी हैदराबादच्या पाटनचेरू येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ क्रॉप रिसर्च (ICRIST) ला भेट देतील आणि ICRIST च्या ५० व्या वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन करतील.
संत रामानुजाचार्य स्वामींच्या जन्माला १००१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी आणि रामानुजाचार्य मंदिर ४५ एकर जागेवर बांधले आहे. मंदिराची मूळ इमारत सुमारे १.५ लाख चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेली आहे. ती ५८ फूट उंच आहे. त्यावर मूर्ती बसवण्यात आला आहे.
भारतात प्रथमच समतेचा संदेश देणाऱ्या वैष्णव संत रामानुजाचार्य स्वामींच्या जन्माला १००१ वर्षे पूर्ण झाली आहेत. हैदराबादमध्ये रामानुजाचार्यांचे भव्य मंदिर बांधले आहे. मंदिरात रामानुजाचार्यांच्या दोन मूर्ती आहेत. पहिली अष्टधातूची २१६ फूट उंचीची मूर्ती बसवण्यात आली असून, त्याला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असे नाव देण्यात आले आहे. दुसरी मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात १२१ ₹ किलो सोन्यापासून बनवली आहे. हैदराबादपासून ४० किमी अंतरावर असलेल्या रामनगरमध्ये बांधलेल्या या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
सनातन परंपरेतील संतांचे पहिले भव्य मंदिर
आजवर सनातन परंपरेतील कोणत्याही संतासाठी इतके भव्य मंदिर बांधले गेले नाही. रामानुजाचार्य स्वामी हे पहिले संत आहेत.मंदिराचे बांधकाम २०१४ मध्ये सुरू झाले. रामानुजाचार्यांचा मोठी मूर्ती चीनमध्ये बनवली आहे. ज्याची किंमत सुमारे ४०० कोटी आहे. अष्टधातुपासून बनवलेली ही सर्वात मोठी मूर्ती आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.
Modi inaugurates Statue of Equality today; The largest idol of Saint Ramanujacharya in the world
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दाऊदचा हस्तक, दहशतवादी अबू बकरला भारतात आणणार
- मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी; लिंगमळा; वेण्णालेक भागात हिमकणांचा वर्षाव
- लोणार सरोवर पाहून राज्यपाल भारावले; पर्यटनाला चालना देण्यासाठी विकासाची धरली अपेक्षा
- फेसबुकचे झाले मेटा आणि झाला मोठा तोटा, शेअसमध्ये २६ टक्के घसरण झाल्याने मार्क झुकेरबर्गच्या संपत्तीत घट
- उत्तर प्रदेशची जनता भाजपसोबत, यावेळी पुन्हा ३०० जागा जिंकणार, अमित शाह यांचा विश्वास