पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय वैर संपूर्ण देशात सर्वश्रुत आहे. आता तसेच राजकीय वैर नरेंद्र मोदी आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यात “विकसित” होताना दिसत आहे. Modi in Hyderabad, Tar K. Chandrasekhar Rao in Bangalore
पंतप्रधान मोदी यांच्या हैदराबाद दौऱ्यात उपस्थित राहणे टाळण्याकडे के. चंद्रशेखर राव यांचा कल दुसऱ्यांदा दिसून आला आहे. आज पंतप्रधान मोदी हैदराबाद बिझनेस स्कूलच्या 20 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हजर होते. पण त्याच वेळी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मात्र बंगलोरमध्ये माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या निवासस्थानी आपल्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेच्या दृष्टीने चर्चा करत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हैदराबाद बिझनेस स्कूलच्या कार्यक्रमात तेलंगणच्या राज्यपाल तमिळ साई सुंदरम आणि केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी हे प्रोटोकॉल नुसार हजर होते. पण मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मात्र स्वतःच्या राष्ट्रीय राजकारणातील असाइनमेंट वर बंगलोरमध्ये होते. त्यांनी देवेगौडा आणि कुमार स्वामी यांच्याशी केंद्रातील भाजपसरकार विरोधी आघाडी तयार करण्याबाबत चर्चा केली. याआधी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याशी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी चर्चा केली होतीच. पण आज पंतप्रधान मोदींच्या तेलंगणवर दौऱ्याचा राजकीय मुहूर्त साधत त्यांनी आजच कर्नाटक राजधानी बंगलोर गाठत देवेगौडा पितापुत्रांशी चर्चा केली आहे.
– स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी अनावरणात गैरहजर
या आधी देखील पंतप्रधान मोदींच्या तेलंगण मधल्या एका कार्यक्रमात हजेरी लावण्याचे के. चंद्रशेखर राव यांनी टाळले होते. स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी अर्थात थोर संत रामानुजाचार्य यांच्या महाकाय पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी के. चंद्रशेखर राव उपस्थित नव्हते. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते तेलंगणच्या राज्यपाल तमिळसाई सुंदरम आणि जी. किशन रेड्डी यांच्याच उपस्थितीत झाले होते. त्यावेळी देखील चंद्रशेखर राव यांनी मोदींच्या बरोबर त्या कार्यक्रमात हजर राहणे टाळले होते.
पंतप्रधान मोदींचे हैदराबाद मधले दोन्ही कार्यक्रम हे अराजकीय स्वरूपाचे होते. परंतु के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या कार्यक्रमांना हजर राहण्याचे टाळून स्वतःच्या दृष्टीने राजकीय रंग द्यायचा तो देऊन घेतला आहे. आता याचा परिणाम तेलंगण विधानसभेच्या निवडणुकीत अथवा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नेमका कसा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Modi in Hyderabad, Tar K. Chandrasekhar Rao in Bangalore
महत्वाच्या बातम्या
- ब्राह्मण संघटना शरद पवारांकडे चर्चेला गेल्याच कशाला??; प्रकाश महाजन यांचा परखड सवाल
- पेट्रोल – डिझेल : रुपया – रूबल दर विनिमय दराच्या नियोजनातून रशियाकडून स्वस्त तेल खरेदीची मोदी सरकारची तयारी
- खंजीर खुपसण्याची भाषा जपून वापरा!!; पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा मराठा संघटनांना इशारा
- चिंतन फळता फळेना; गळती थांबता थांबेना!!; कपिल सिब्बल काँग्रेस सोडून समाजवादीच्या पाठिंब्यावर राज्यसभेच्या वाटेवर!!