विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हमास विरुद्ध इस्रायल युद्धात एकीकडे मोदी सरकार इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असताना दुसरीकडे काँग्रेससह समाजवादी पार्टी, डाव्या पक्षांनी पॅलेस्टाईननला पाठिंबा दिला, पण आता हा पाठिंबा केवळ तोंडी उरला नसून सावरकर विरोधक मणिशंकर अय्यर यांच्यासह डाव्या पक्षांच्या, समाजवादी पार्टीच्या तसेच राष्ट्रीय जनता दलाच्या काही खासदारांनी पॅलेस्टिनी दूतावासात जाऊन त्या देशाला पाठिंबा दिला आहे. modi govt with israil and congress left with palestine
इस्रायलने पॅलेस्टाईन विरुद्ध नसून हमास दहशतवादी संघटनेविरुद्ध युद्ध पुकारले आहे. पण हे युद्ध पॅलेस्टाईन विरुद्ध असल्याचे भासवून काँग्रेस, डावे, पक्ष समाजवादी पार्टी या विरोधी पक्षांनी आपला पॅलेस्टिनींना पाठिंबा जाहीर केला आहे.
आज पॅलेस्टिनी दूतावासात मणिशंकर अय्यर, मनोज झा, दानिश अली, के. सी. त्यागी, डी. राजा, मोहम्मद अफजल, जावेद अली खान, मुजफ्फर शाह, सुभाषिनी अली, संतोष भारतीय, श्रीकांत जेना, शाहिद सिद्दिकी मोहम्मद अदीब, नदीम खान या डाव्या, समाजवादी पार्टीच्या खासदारांनी जाऊन त्या देशाला पाठिंबा व्यक्त केला. पॅलेस्टाईनच्या भारतातल्या राजदूताशी त्यांनी चर्चा केली.
पॅलेस्टिनी नागरिकांना ठार करणे थांबवा ; इस्रायलविरोधात मुस्लिम राष्ट्रांची कोल्हेकुई
या सर्व खासदारांनी नंतर एक प्रेस रिलीजही जारी केले. त्यात भारत सरकारच्या इजराइलला पाठिंबा देण्याच्या भूमिकेचा विरोध करून भारत आणि पॅलेस्टाईन यांच्यातले पारंपारिक संबंध आम्ही दृढ करणार आहोत, असा निर्धार व्यक्त केला. इस्राइलने गाजापट्टीवरचे हल्ले ताबडतोब थांबवावेत अशी मागणीही या खासदारांनी केली.
मोदी सरकारने इस्रायलला पाठिंबा दिला, असला तरी पॅलेस्टिनी नागरिकांची सुरक्षितता आणि पॅलेस्टिनींच्या न्याय्य हक्कांना डावललेले नाही, तरी देखील मणिशंकर अय्यर यांच्यासह डाव्या पक्षांच्या आणि समाजवादी पार्टीच्या खासदारांनी मुद्दामून पॅलेस्टिनी दूतावासात जाऊन त्या देशाला पाठिंबा देण्याचा बहाणा करत मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
modi govt with israil and congress left with palestine
महत्वाच्या बातम्या
- फ्रेंच कंपनीला भारतात राफेल निर्मितीची इच्छा; नागपूरजवळ मिहानला राफेल असेंब्ली लाइनवर झाली चर्चा
- मीरवाइज उमर फारूक बदलले; पॅलेस्टिनी हक्कांसह इस्रायली हक्कांच्या जपणुकीचीही भाषा बोलू लागले!!
- संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर जम्मू – काश्मीरमध्ये संघकार्य विस्तारावर सरसंघचालकांचा भर!!
- ‘पाकिस्तान हमासच्या दहशतवाद्यांना विजय समर्पित करू शकला नाही’, भारताच्या विजयानंतर इस्रायलच्या राजदूताचा टोमणा!