‘मेटा’ला मागावी लागली माफी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Modi governments आता मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या विधानावर कंपनीने भारताची माफी मागितली आहे. कंपनीने म्हटले आहे की ही चूक अनवधानाने झाली. मेटा इंडियाच्या उपाध्यक्षांनी सोशल मीडियावर पोस्ट करून जाहीरपणे माफी मागितलीModi governments
तत्पूर्वी, भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे, जे संसदीय स्थायी समितीचे प्रमुख आहेत, त्यांनी मंगळवारी सांगितले की, गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भारतातील सत्ताधारी पक्षाचा पराभव झाला अशी टिप्पणी केल्यानंतर पॅनेल मेटाला समन्स बजावेल.
कोविड-19 नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भारतासह विविध देशातील सरकारे निवडणुकीत पराभूत झाली होत,असे वक्तव्य मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी एका पॉडकास्टमध्ये केले होते. यावर संसदीय समितीने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
भाजप खासदार तथा माहिती व प्रसारण संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे म्हणाले होते की, मेटाला या चुकीच्या माहितीबद्दल माफी मागावी लागेल. या चुकीच्या माहितीबद्दल मेटाला पाचारण करणार आहे.
Modi governments tough stance on Mark Zuckerbergs comments
महत्वाच्या बातम्या
- Basavaraj Teli आष्टीचा जावई येथे आणून बसविला, एसआयटीचे प्रमुख बसवराज तेलीवर वाल्मीक कराडच्या बायकोचा आरोप
- Delhi : दिल्लीतील ४०० शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक
- Sanjay Raut : संजय राऊतांना अचानक झाली भाजपची आठवण अन् काँग्रेसला दिलेला सल्ला
- PM Modi : IMDच्या १५० व्या स्थापना दिनी पंतप्रधान मोदींनी सुरू केले ‘मिशन मौसम’