• Download App
    पीएम किसान सन्मान निधीचे 16000 कोटी रुपये 17 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमाModi government's Diwali gift: Rs 16000 crore for PM Kisan Samman Fund

    मोदी सरकारची दिवाळी भेट : पीएम किसान सन्मान निधीचे 16000 कोटी रुपये 17 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : खरीप हंगाम संपुष्टात येताना आणि रब्बी हंगामाची सुरुवात होताना केंद्रीय कृषि मंत्रालयाने 17 आणि 18 ऑक्टोबर 2022 रोजी केंद्रीय कृषी अनुसंधान संस्थेत शेतकरी महासंमेलन आयोजित केले आहे. Modi government’s Diwali gift: Rs 16000 crore for PM Kisan Samman Fund

    या शेतकरी महासंमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 16 हजार कोटी रुपय जमा करणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 2022 चा हा 12 वा हप्ता असून ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर करोडो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या संदर्भात माहिती दिली.

    केंद्रीय कृषी अनुसंधान संस्थेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय शेतकरी महासंमेलनात नैसर्गिक शेती, हवामान बदलाचा शेतीवर परिणाम तसेच किफायतशीर शेती या विषयावर भर देऊन विविध परिसंवाद घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर एक कृषी उत्पादन महाप्रदर्शन देखील यानिमित्ताने आयोजित केले आहे.

    Modi government’s Diwali gift: Rs 16000 crore for PM Kisan Samman Fund

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Guru Prakash Paswan : भाजपने म्हटले-राहुल गांधी फुटीरतावादी राजकारणाचे उदाहरण; राज्यानुसार राजकारण बदलते

    Dayanidhi Maran : DMK खासदार म्हणाले- उत्तरेत महिलांना मुले जन्माला घालण्यास सांगितले जाते, तामिळनाडूत शिक्षणावर भर, भाजप नेत्याने म्हटले- मारन यांना कॉमन सेन्स नाही

    Zubeen Garg : सिंगापूर पोलिसांनी सांगितले-गायक जुबीनचा मृत्यू बुडून झाला; नशेत लाइफ जॅकेट घालण्यास नकार दिला होता