वृत्तसंस्था
नवी दिल्ली : खरीप हंगाम संपुष्टात येताना आणि रब्बी हंगामाची सुरुवात होताना केंद्रीय कृषि मंत्रालयाने 17 आणि 18 ऑक्टोबर 2022 रोजी केंद्रीय कृषी अनुसंधान संस्थेत शेतकरी महासंमेलन आयोजित केले आहे. Modi government’s Diwali gift: Rs 16000 crore for PM Kisan Samman Fund
या शेतकरी महासंमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 16 हजार कोटी रुपय जमा करणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 2022 चा हा 12 वा हप्ता असून ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर करोडो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या संदर्भात माहिती दिली.
केंद्रीय कृषी अनुसंधान संस्थेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय शेतकरी महासंमेलनात नैसर्गिक शेती, हवामान बदलाचा शेतीवर परिणाम तसेच किफायतशीर शेती या विषयावर भर देऊन विविध परिसंवाद घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर एक कृषी उत्पादन महाप्रदर्शन देखील यानिमित्ताने आयोजित केले आहे.
Modi government’s Diwali gift: Rs 16000 crore for PM Kisan Samman Fund
महत्वाच्या बातम्या
- तुर्कीतील कोळसा खाणीत मोठा स्फोट : 22 जण ठार, अनेक जण अडकल्याची भीती, बचाव कार्य सुरू
- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा का जाहीर झाल्या नाहीत, निवडणूक आयोगाने दिले हे उत्तर..
- दोनदा भाजपबरोबर आयाराम – गयाराम करणारे नितीश कुमार म्हणाले, “भाजप बरोबर कधीच जाणार नाही”!!
- सरकारी नोकरीची संधी : SSC अंतर्गत ९९० पदांसाठीची भरती; करा ऑनलाईन अर्ज