वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ऑनलाइन मोबाईल गेम जिहाद या गंभीर प्रकाराची केंद्रातील मोदी सरकारने दखल घेतली असून 3 प्रकारच्या घातक ऑनलाइन गेम्स वर बंदी घालण्याची तयारी केंद्र सरकारने चालविल्याची माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे. Modi government takes serious notice of online game Jihad
ऑनलाइन गेम पोर्टल द्वारे धर्मांतराला चिथावणी देणाऱ्या घटना समोर आल्यानंतर केंद्र सरकारने त्याची दखल घेतली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि महाराष्ट्रातील मुंब्रा कनेक्शन मधून तब्बल 400 मुलांचे धर्मांतर ऑनलाइन गेमच्या माध्यमातून झाल्याची माहिती समोर आल्यानंतर केंद्र सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे.
या प्रकरणात ऑनलाइन गेम जिहादचा मास्टर माईंड शहानवाज मकसूद खान उर्फ बड्डो याला कालच मुंब्रा पोलिसांनी अटक केली. त्याचा साथीदार अन्सारीच्या कबुली जबाबदातून 400 मुलांचे धर्मांतर ऑनलाईन गेमच्या माध्यमातून झाल्याचे पुढे आले आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र पोलीस या सर्व प्रकरणांचा सखोल तपास करत आहेत.
या पार्श्वभूमीवर ज्या ऑनलाइन गेम मध्ये बेटिंग आहे किंवा ज्यातून एडिक्टिव्ह कन्टेन्ट पसरवला जातो आणि ज्यातून धार्मिक हिंसाचाराला प्रोत्साहन दिले जाते, या 3 प्रकारच्या ऑनलाइन गेम्स वर केंद्र सरकार बंदी आणेल, अशी ग्वाही राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे.
मोबाईल गेम जिहादचा मास्टर माईंड शहानवाज मकसूद खान उर्फ Baddo याला मुंब्र्यातूनच अटक
मोबाईल गेमच्या नावाखाली टिन एज मुलांचे धर्मांतराचे रॅकेट चालवणारा मोबाईल गेम जिहादचा मास्टर माईंड शहानवाज मकसूद खान उर्फ Baddo याला उत्तर प्रदेश मधील गाजियाबाद पोलिसांनी याच्यावर अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी मोबाईल गेम जिहाद मधून जैन मुलाचे धर्मांतर घडवण्याची केस समोर आली होती. त्यानंतर गाजियाबाद ते मुंब्रा असे कनेक्शन पोलीस तपासात पुढे आले होते. तेव्हाच शहानवाज मकसूद खान उर्फ Baddo हा मास्टर माईंड असल्याचे समजले होते. पण तो मुंब्रातून पळून गेला होता. त्याने तब्बल 400 मुलांचे धर्मांतर केवळ मोबाईल गेम जिहाद मधून केल्याचा गाजियाबाद मधला त्याचा साथीदार अन्सारी याने पोलिसांना कबुली जबाब दिला होता. या सर्व प्रकरणाला नंतर राजकीय वळण लागून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 400 मुले सोडा, चार मुले धर्मांतरित झाल्याचे दाखवा. मी राजीनामा देईन. अन्यथा मुंब्रा बंद करू, अशी धमकी दिली होती. पण अखेरीस मोबाईल गेम जिहादचा मास्टर माईंड शहा शहानवाज मकसूद खान याला पोलिसांनी अटक केली आहे. Baddo हे त्याच्या मोबाईल गेम ॲप्सचे नाव होते.
हे संपूर्ण प्रकरण असे :
मोबाईल गेम जिहाद मधून धर्मांतराचे मुंब्रा कनेक्शन बाहेर येताच जितेंद्र आव्हाडांचा संताप; दिली मुंब्रा बंदची धमकी!!
मोबाईल गेम जिहाद मधून धर्मांतराचे गाजियाबाद – मुंब्रा कनेक्शन बाहेर येताच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड भडकले आणि त्यांनी थेट मुंब्रा बंदची धमकी दिली. उत्तर प्रदेशातील गाजियाबाद मध्ये एका जैन मुलाच्या धर्मांतराची केस समोर आल्यानंतर काही धक्कादायक खुलासे उत्तर प्रदेश पोलिसांनी केले.
मोबाईल गेम जिहाद मधून हिंदू मुलांचे धर्मांतर करण्याचा मामला समोर आला. या प्रकारात उत्तर प्रदेशातल्या एका आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली. त्या आरोपीच्या तपास आणि चौकशी त्याने तब्बल 400 मुलांचे धर्मांतर केल्याचा दावा केला आणि मुख्य आरोपी मुंब्राचा असल्याचे सांगितले.
यासंदर्भात उत्तर प्रदेश पोलिसांचा तपास सुरू आहे. त्याची माहिती तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. मात्र ही माहिती देताना त्यांनी जो 400 मुलांचे धर्मांतर हा आकडा सांगितला आणि त्यातही मुंब्रा कनेक्शन सांगितले, त्यामुळे जितेंद्र आव्हाड भडकले. कारण जितेंद्र आव्हाड हे मुंब्राचे आमदार आहेत त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर महाराष्ट्राला आणि मुंब्रा गावाला बदनाम करण्याचा आरोप केला. त्याचवेळी त्यांनी 400 च काय, पण 4 मुले धर्मांतरित झाल्याचे दाखवा मी आमदारकीचा राजीनामा देईन, असा इशारा दिला. यावेळी त्यांनी काही अपशब्द वापरले. त्यापुढे जाऊन त्यांनी एक जुलै रोजी मुंब्रा बंद करून दाखवू, अशी धमकी दिली.
ही मूळ केस अशी :
धक्कादायक : गाझियाबाद – मुंब्रा कनेक्शन; मोबाईल गेम जिहादमधून एकट्या मुंब्रातून तब्बल 400 मुलांचे धर्मांतर!!
गाजियाबाद – मुंब्रा कनेक्शन मधून एक दोन नव्हे तर तब्बल 400 मुलांचे धर्मांतर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. डीसीपी निपुण अग्रवाल यांनी ही माहिती दिली. या संदर्भात अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या कबुली जबाबात तब्बल 400 मुलांचे धर्मांतर एकट्या मुंब्रात झाल्याचे म्हटले आहे. या संदर्भातली माहितीही छाननी पोलीस करत असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.
या संदर्भातील माहिती अशी :
एक 17 वर्षीय जैन मुलगा बेपत्ता झाला. नंतर तो उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथल्या मशिदीत नमाज पढत असताना सापडला. झाकीर नाईकच्या प्रभावाने धर्मांतराचा विचार केल्याचे त्याने कबूल केले. या मुलाच्या वडिलांनी इमाम आणि अन्य एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली.
मात्र या तक्रारीतून मोबाईल गेम जिहादचा एक गंभीर प्रकार समोर आला. त्यात मस्जिद समितीच्या एका माजी सदस्याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलीस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. अब्दुल रहमान अन्सारी उर्फ नन्नी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो गाझियाबाद मधलाच रहिवासी आहे, तर त्याचा साथीदार ठाणे मुंब्रा इथला रहिवासी असून त्याचे खरे नाव शहानवाज मकसूद खान असे आहे. तो बड्डो या बनावट नावाने मोबाईल गेमच्या खेळात अल्पवयीन मुलांना अडकवायचा डाव खेळत असे. याच शहानवाज मकसूद खान याने मुंब्रा परिसरात 400 मुलांचे धर्मांतर केल्याची माहिती गाझियाबाद पोलिसांनी अटक केलेल्या अब्दुल रहमान अन्सारी उर्फ नन्नी यांनी पोलिसांना दिली. पोलीस या माहितीची छाननी करत आहेत.
मात्र, दरम्यानच्या काळात या प्रकरणातला मुख्य आरोपी शहानवाज मकसूद खान हा मुंब्रा परिसरातून फरार झाला आहे. 1 जून रोजी त्याने आपले कुटुंब सोलापूरला हलविल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर तो गायब झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत, असे डीसीपी निपूण अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
धर्मांतराची मोडस ऑपरेंडी
फोर्टनाइट सारख्या गेमिंग एप्सवर सक्रिय असलेली एक टोळी हिंदू मुलांचे ब्रेनवॉश करते आणि त्यांना गेम जिंकण्यासाठी कुराणाचे श्लोक वाचायला लावते, असे गाजियाबाद पोलिसांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
यात पोलिसांनी संबंधित गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी देखील स्पष्ट केली आहे. बनावट नावाने गेमिंग ॲप तयार करून अल्पवयीन मुलांना टॅप केले जायचे. ते जिंकले तर त्यांना बक्षीस आणि हरले तर त्यांना कुराणाच्या आयाती पढवल्या जायच्या. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात त्यांना इस्लामची माहिती दिली जायची आणि त्यानंतर झाकीर नाईकची इस्लामी प्रचाराची भाषणे ऐकवली जायची. यातून मुलांचे ब्रेनवॉश करून त्यांना इस्लाममध्ये धर्मांतर करायला लावायचे हा डाव होता.
गाजियाबाद मध्ये अटक केलेला अब्दुल रहमान अन्सारी उर्फ नन्नी हा मशिद कमिटीचा सदस्य होता. परंतु त्याला नंतर त्या सदस्य पदावरून बाजूला करून इस्लामच्या प्रचारासाठी मोकळे सोडण्यात आले होते. त्याची आणि ठाणे – मुंबऱ्यातील शहानवाज मकसूद खान याची ओळख झाली आणि त्यांनी वेगवेगळे मोबाईल गेम्स सापळे रचले. त्यात एक जैन मुलगा अडकला. त्या मुलाची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर हा मोबाईल गेम जिहादचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
यातूनच मुंब्रा परिसरात एक दोन नव्हे, तर तब्बल 400 जणांचे धर्मांतर केल्याची कबुली अब्दुल रहमान अन्सारी उर्फ नन्नी याने दिली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात केवळ लव्ह जिहादच नव्हे, तर मोबाईल गेम जिहाद किती भयानक पद्धतीने सक्रिय आहे हे स्पष्ट झाले आहे.
या केस वरूनच जितेंद्र आव्हाड भडकले मुंब्रा कनेक्शन समोर येतात त्यांनी 1 जुलैला मुंब्रा बंद करण्याची धमकीही दिली.
Modi government takes serious notice of online game Jihad