Modi Government 2.0 : केंद्रात मोदी सरकार सत्तेवर येऊन आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळाचीही दोन वर्षे झाली आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जेपी नड्डा यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना यानिमित्ताने कोणतेही कार्यक्रम आयोजित न करण्याचे पत्र लिहिले आहे. त्याऐवजी सरकार कल्याणकारी कार्यक्रम आयोजित करू शकतात. सर्व भाजप शासित राज्यांना पक्षाच्या हायकमांडने कोरोनाबाधित लोकांना मदत करण्यासाठी योजना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. Modi Government Second Term two years BJP MP and MLAs to visit Villages amid covid pandemic
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रात मोदी सरकार सत्तेवर येऊन आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळाचीही दोन वर्षे झाली आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जेपी नड्डा यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना यानिमित्ताने कोणतेही कार्यक्रम आयोजित न करण्याचे पत्र लिहिले आहे. त्याऐवजी सरकार कल्याणकारी कार्यक्रम आयोजित करू शकतात. सर्व भाजप शासित राज्यांना पक्षाच्या हायकमांडने कोरोनाबाधित लोकांना मदत करण्यासाठी योजना तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
याव्यतिरिक्त देशातील सर्व भाजप आमदार आणि खासदारांना दोन गावांतील लोकांची मदत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी तयार केलेल्या योजनेनुसार 30 मे रोजी पक्षाचे नेते 1 लाख खेड्यांना भेट देतील. यादरम्यान भाजपमधील कार्यकर्ते खेड्यातील लोकांना मास्क, सॅनिटायझर, रेशन यासारख्या अत्यावश्यक वस्तूंचे किट पुरवतील आणि संसर्ग टाळण्यासाठी लोकांना जागरूक करतील. एवढेच नाही, तर केंद्रीय मंत्र्यांनाही किमान दोन गावे भेट देण्यास सांगितले आहे. मंत्र्यांना पोहोचणे शक्य नसल्यास त्यांना व्हिडिओ सभेचे निर्देश देण्यात आले आहेत.
कलम 370 हटविणे ही मोदी सरकार 2.0 ची सर्वात मोठी उपलब्धी
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविणे ही नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील सर्वात मोठी उपलब्धी आहे. एबीपी-सी व्होटर मोदी 2.0 रिपोर्ट कार्डच्या आकडेवारीत हे उघड झाले आहे. एबीपी-सी व्होटर सर्वेक्षणानुसार 47.4 टक्के लोकांनी म्हटले आहे की, कलम 370 रद्द करणे ही मोदी सरकारची सर्वात मोठी उपलब्धी आहे, तर 23.7 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ही सर्वात मोठी उपलब्धी आहे.
एबीपीने लोकसभेच्या 543 जागांवर केलेल्या सर्वेक्षणात 1.39 लाख लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. 1 जानेवारी ते 28 मे 2021 पर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की लोक लॉकडाऊनवर सरकारला पाठिंबा देत आहेत. मोठ्या प्रमाणावर, 68.4 टक्के लोकांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षी देशभरात लॉकडाउनची अंमलबजावणी हा योग्य निर्णय होता. त्याचप्रमाणे, 53.4 टक्के लोकांनी म्हटले आहे की, यावर्षी देशभरात लॉकडाऊन न करणे हा मोदी सरकारचा योग्य निर्णय आहे.
त्याचवेळी 41.8 टक्के लोकांनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला आहे. कोरोना कालावधीत प्रकल्प सुरू ठेवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे लोकांनी समर्थन केले आहे. याव्यतिरिक्त लसीकरण कार्यक्रमाच्या संचालनाबाबत जनतेचे मत विभागले गेले आहे. 44.9 टक्के म्हणाले की सरकारने लस व्यवस्थापन योग्य प्रकारे हाताळले आहे, तर 43.9 टक्के लोकांना असे वाटत नाही. लसींच्या निर्यातीच्या निर्णयालाही व्यापक पाठिंबा मिळाला आहे, कारण कोविड लसींच्या निर्यात करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे 47.9 टक्के लोकांनी समर्थन केले आहे.
Modi Government Second Term two years BJP MP and MLAs to visit Villages amid covid pandemic
महत्त्वाच्या बातम्या
- गोव्याचा पर्यटनाचा बेत रद्दच करा ; संचारबंदी 7 जूनपर्यंत वाढविली
- Cyclone Yaas Effect Odisha : चक्रीवादळात बाळ जन्मले नाव ठेवले ‘यास’ !अरेच्चा तब्बल ७५० बाळांचा जन्म ! काय म्हणावे ‘ यास ‘ ?
- Corona Vaccination : लसीकरण प्रमाणपत्र द्या, अन्यथा पगार नाही; उत्तरप्रदेशात आदेशाने कर्मचाऱ्यांची तारांबळ
- ठाणे : व्हॅक्सिन के लिए कुछ भी करेगा ! लस घेण्यासाठी अभिनेत्री झाली कोविड सेंटरची सुपरवायजर ; भाजपने काढले वाभाडे
- आता देवच तुम्हाला वाचवेल, मेघालय सरकार कोरोनासमोर हतबल ; प्रार्थना करण्याचे आवाहन