विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधी यांनी अदानी मुद्दा लावून धरला असतानाच काँग्रेसने केंद्रातल्या मोदी सरकारवर नवा आरोप केला आहे. देशातल्या दोन हेरांचा जनतेवर आणि अन्य कोणावर विश्वास नाही. त्यामुळे देशाचे तब्बल 986 कोटी रुपये खर्च करून ते कॉग्नाईट नावाच्या कंपनीची नवी हेरगिरीचे उपकरण खरेदी करत आहेत. त्या उपकरणांद्वारे सर्व विरोधकांवर नजर ठेवण्याचे काम सरकार करणार आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या नियमित पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी कॉग्नाईट स्पायवेअर संदर्भात हे आरोप केले आहेत. Modi government preparing to buy spy equipment from Cognyte at a cost of Rs 986 crore
मोदी सरकारने पेगासास कंपनीला देशातल्या विरोधकांवर हेरगिरी करण्याची कामगिरी सोपवली होती. पण ती कामगिरी फेल झाली आणि पेगासर बदनाम झाले. त्यामुळे आता कॉग्नाईट कडून मोदी सरकार हेरगिरीची नवी उपकरणे खरेदी करत आहे आणि त्यासाठी देशाच्या जनतेचे तब्बल 986 कोटी रुपये खर्च करत आहे, असा आरोप पवन खेडा यांनी केला आहे.
देशाचे शहेनशहा घाबरले आहेत. आपण उभा केलेला हा खोटा महाल आता कोणत्याही क्षणी कोसळू शकतो याची भीती त्यांना वाटते आहे आणि म्हणूनच विरोधकांवर हेरगिरी करण्यासाठी त्यांना नव्या स्पायवेअरची गरज भासल्याने त्यांनी कॉगनाईट कडून काही उपकरणांची खरेदी चालवली आहे, असा आरोप करून पवन खेडा यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
कॉग्नाईट कडून कुठली संचार उपकरणे खरेदी केली जात आहेत का?? ती कोणत्या मंत्रालयाकडून खरेदी केली जात आहेत आणि कोणत्या मंत्रालयाने रिक्वेस्ट ऑफ प्रपोजल जारी केले आहे??, याची माहिती सरकारने दिली पाहिजे, अशी मागणी पवन खेडा यांनी केली आहे.
केंद्र सरकारने अद्याप काँग्रेसच्या या प्रश्नांना उत्तरांचा प्रतिसाद दिलेला नाही. मात्र सोशल मीडियावर पेगासस आणि कॉग्नाईट या मुद्द्यांची जोरदार चर्चा सुरू असून वेगळाच योगासच मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने फटकार लावल्यावर काँग्रेसला गप्प बसावे लागले. पेगासच द्वारे कोणती हेरगिरी झाल्याचे सिद्ध झाले नाही. त्यामुळे जाता काँग्रेसने नवे लावावे आरोप केले आहेत, असे शरसंधान अनेकांनी सोशल मीडिया वरून साधले आहे.
Modi government preparing to buy spy equipment from Cognyte at a cost of Rs 986 crore
महत्वाच्या बातम्या