वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात अनेक राजकीय पक्षांची आणि संघटनांची जातनिहाय जनगणना घेण्याची मागणी आहे. परंतु, ही मागणी टाळण्याचा केंद्रातल्या मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.Modi government not intended for caste base cencus, alleged lalu yaav
बिहार विधानसभेने एक मताने जातीनिहाय जनगणना घेण्याचा ठराव संमत केला आहे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना घेतली नाही तर बिहार सरकार राज्यामध्ये जातीनिहाय जनगणना घेईल, असे जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर लालूप्रसाद यादव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
देशात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या वाढली आहे. जातीनिहाय जनगणनेत ही लोकसंख्या प्रतिबिंबित झाली, तर त्यांना त्या प्रमाणात आरक्षण द्यावे लागेल आणि ते आरक्षण देणे मोदी सरकारला नको आहे. त्यामुळेच मोदी सरकार जातिनिहाय जनगणना घेणे टाळण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. देशातील अनेक राज्यांमधून जातीनिहाय जनगणनेचा आग्रह धरण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. परंतु जनगणना ही डिजिटल स्वरूपात होईल ही भूमिका आधीच स्पष्ट करण्यात आली आहे
Modi government not intended for caste base cencus, alleged lalu yaav
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रपती रायगडावर हेलिकॉप्टरने नव्हे, रोपवेने येणार; शिवभक्तांच्या भावनांचा आदर राखल्याबद्दल खा. संभाजीराजेंनी मानले आभार
- धक्कादायक : शेतकऱ्याने विकला ११२३ किलो कांदा, हाती आले १३ रुपये, राजू शेट्टी म्हणतात- यातून सरकारचं तेरावं घालायचं का?
- आज मोदी, तर 16 डिसेंबरला राहुल गांधी उत्तराखंडच्या मोहिमेवर; 18 हजार कोटींच्या प्रकल्पांचा मोदींच्या हस्ते शिलान्यास