• Download App
    देशात 71426 युवकांना मोदी सरकारची नोकरीची नियुक्तीपत्रे; पंतप्रधानांचा युवकांशी संवादModi government job appointment letters for 71426 youth in the country

    देशात 71426 युवकांना मोदी सरकारची नोकरीची नियुक्तीपत्रे; पंतप्रधानांचा युवकांशी संवाद

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने दीड वर्षात 10 लाख सरकारी पदे भरतीचा जो कार्यक्रम आखला आहे, या कार्यक्रमांतर्गत देशभरात आज 71426 युवकांना मोदी सरकारने नोकरीची नियुक्तीपत्रे जारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन कार्यक्रमात ही नियुक्तीपत्रे संबंधित युवकांना वाटप केली. Modi government job appointment letters for 71426 youth in the country

    यावेळी पंतप्रधानांनी या युवक युवतींशी ऑनलाइन संवाद साधला. भारतामध्ये येत्या काही काळात पायाभूत सुविधांमध्ये 100 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे यामुळे रोजगार आणि नोकरीच्या अपार संधी उपलब्ध होत आहेत. विकासाची गती वाढली आहे आणि त्यामुळे स्वयंरोजगाराच्या ही अमाप संधी पुढे आल्या आहेत, याकडे पंतप्रधानांनी युवकांचे लक्ष वेधले.

    त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी सरकारी भरतीमध्ये पारदर्शकता आणि वेग वाढल्याचेही आवर्जून सांगितले. ऑनलाइन सुविधा उपलब्ध झाल्याने भरती प्रक्रियेत पारदर्शकता तर आलीच, पण ती अधिक वेगवान आणि ठरवलेल्या विशिष्ट वेळेत पूर्ण होत आहे. नवनियुक्त युवकांनी देखील या भरतीचा लाभ जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. ठिकठिकाणी होत असलेले रोजगार मिळेल आता केंद्र सरकारची वेगळी ओळख बनले आहेत. नियुक्ती झालेल्या सर्व युवकांनी आपला कारभार आणि जबाबदारी पारदर्शकतेने आणि कार्यक्षमतेने पूर्ण करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केले.

    मिळालेली नोकरी आणि रोजगार हा कुटुंब पालनासाठी महत्त्वाचा आहेच. पण त्याहीपेक्षा देशातल्या जनतेच्या सेवेसाठी तो अधिक समर्पित आहे, याकडे पंतप्रधान मोदींनी नवनियुक्त युवक युवतींचे लक्ष वेधले.

    Modi government job appointment letters for 71426 youth in the country

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट